मित्रांनो, एकीकडे सध्या आयपीएलचे अतिशय अद्भूत वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा एक खेळाडू आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. याचे कारण म्हणजे आता या खेळाडूला भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये पुन्हा संधी मिळणे कठीण जात आहे. या खेळाडूने नोव्हेंबर २०२१ मध्ये भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आयपीएलचा शेवटचा सामना मे २०२१ मध्ये खेळला गेला होता. मात्र आता अत्यंत खराब फॉर्ममुळे हा खेळाडू निवृत्तीचा विचार करत आहे. कारण आता या खेळाडूचे भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये पुनरागमन होणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी मानले जात नाही. भारतीय संघाचे दरवाजे या खेळाडूसाठी जवळपास बंद झाले आहेत. अलीकडेच बीसीसीआयच्या निवड समितीने या खेळाडूला भारतीय संघातूनही वगळले होते. आता आयपीएलच्या मध्यावर जर या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. हा खेळाडू दुसरा कोणी नसून भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आहे.
View this post on Instagram
सध्या इशांत शर्माला भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये संधी दिली जात नाही. इशांतने आतापर्यंत आयपीएलमध्ये जवळपास ९३ सामने खेळले आहेत. जिथे त्याने ८.११ च्या इकॉनॉमी रेटने ७२ विकेट घेतल्या आहेत, १२ धावांत ५ बळी ही या खेळाडूची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आपल्या सर्वांना माहित असेल की गोलंदाजांमध्ये आता भारतीय संघाची निवड मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह अशी झाली आहे. याशिवाय चौथ्या गोलंदाजांमध्ये उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे भारतीय संघ व्यवस्थापनाची पसंती ठरले आहेत. त्यामुळे आता इशांत शर्माला कोणी विचारत नाही.
भारतीय संघात इशांतसाठी जागा उरलेली नाही. कारण सीनियर गोलंदाजांपैकी एक असलेला इशांत शर्मा बराच काळ फ्लॉप ठरत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात इशांत शेवटचा दिसला होता. त्या सामन्यातही तो एकही विकेट घेऊ शकला नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे तिघेही अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर अष्टपैलू खेळाडू असलेल्या शार्दुल ठाकूरचे नाव येते. पाचव्या क्रमांकासाठी उमेश यादवला पसंती दिली जात आहे. या सर्व गोष्टींवरून हे स्पष्ट झाले आहे की, आता इशांत कडे निवृत्ती घेण्याचा एकच मार्ग उरला आहे.