आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात तगडे रेकॉर्ड आहेत, ज्यांना तोडणे Impossible आहे..!

आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग आहे. दरवर्षी जगातील सर्वोत्तम खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी येतात. जेव्हा असे मोठे खेळाडू लीगमध्ये खेळतात तेव्हा विक्रम रचणे आणि मोडणे ही सामान्य गोष्ट आहे. पण आयपीएलमध्ये काही खास विक्रम आपण सर्वांनी अनेकदा पाहिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही आणि या विक्रमांच्या जवळपासही कोणी पोहोचू शकले नाही.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने ३० चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. गेलने ६६ चेंडूत १७५ धावांची खेळी खेळली होती, ज्यात त्याने १७ षटकार आणि १३ चौकार मारले होते.

दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळताना अल्झारी जोसेफने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ३.४ षटकांत १२ धावांत ६ बळी घेतले होते. आपल्या स्पेलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे.

View this post on Instagram

A post shared by CricTracker (@crictracker)

आयपीएलमध्ये जेव्हा जेव्हा षटकार मारण्याचा विचार येतो तेव्हा ख्रिस गेलचे नाव येते. अशा स्थितीत हा विक्रम दुसऱ्याच्या नावावर कसा असू शकतो. ख्रिस गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध १७ षटकार ठोकले होते, जे आतापर्यंत एका डावात सर्वाधिक षटकार आहेत, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ब्रेंडन मॅक्युलम आहे ज्याने एका डावात १३ षटकार मारले होते.

विराट कोहलीने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत, आयपीएलमध्येही कोहली एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. २०१६ हे वर्ष त्याच्यासाठी आयपीएलमधील सर्वोत्तम ठरले होते. त्याने १६ सामन्यात ९७३ धावा केल्या होत्या, ज्या एका मोसमात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. केएल राहुलने २०१८ मध्ये १४ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. राहुलने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १४ चेंडूत ५१ धावांची खेळी खेळली होती. हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

टी-२० क्रिकेटमध्ये १७५ ही मोठी धावसंख्या मानली जाते. पण ख्रिस गेलने आयपीएलमध्ये एकदा एकट्याने १७५ धावांची इनिंग खेळली आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खेळी आहे. गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध हा विक्रम केला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप