रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रचला हा इतिहास, पहिल्यांदाच..

अहमदाबादमध्ये शुक्रवारी  खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी पराभव करून मालिका ३ -० ने जिंकली. एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे. नवीन कर्णधार रोहितनेही एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या कर्णधारपदापासून सुरू असलेली मालिका विजयाची परंपरा सुरू ठेवली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचलाआहे, पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला आहे , तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ९६ धावांनी पराभव करत मालिका 3_0 अशी खिशात घातलीच. पण कर्णधार रोहित शर्मासाठी हा विजय ऐतिहासिक होता, कारण टीम इंडियाने प्रथमच एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला आहे. मॅचबद्दल बोलायचं झालं तर टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेत टीम इंडियानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २६६ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ज्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १६९ धावांत सर्वबाद झाला.

वेस्ट इंडिजकडून लक्ष्याचा पाठलाग करताना ओडियन स्मिथने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर कर्णधार निकोलस पूरनने 34 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजचे काही फलंदाज वगळता एकाही फलंदाजाने संघाला विजय मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली नाही आणि निष्काळजी फटके खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारतासाठी या सामन्यात मोहम्मद सिराजने 3, प्रसिद्ध कृष्णाने 3 बळी घेतले. याशिवाय दीपक चहर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

रोहित शर्मा (१३), शिखर धवन (१० ) आणि विराट कोहली (०) स्वस्तात बाद झाले. ओडियन स्मिथने शिखरची विकेट घेतली. त्याच वेळी, अल्झारी रोहित आणि विराटला चालतो. सूर्यकुमारही फार काही करू शकला नाही आणि केवळ ६ धावा करून बाद झाला.

त्याबरोबरच श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकं ठोकले  श्रेयस अय्यरने कोरोना संसर्गावर मात केल्यानंतर भारतासाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर ऋषभ पंतने ५६ धावा केल्या. अवघ्या ४२ धावांत भारताच्या तीन विकेट पडल्या. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या११०  धावांच्या भागीदारीने संघाला चांगलीच मजल मारली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ५० धावांत ३ गडी गमावून संघर्ष करत होता. यानंतर कोविडमधून सावरल्यानंतर संघात परतलेल्या श्रेयस अय्यरने १११ चेंडूत ८० धावा केल्या आणि ऋषभ पंतने ५४ चेंडूत ५६ धावा केल्या.

या दोघांशिवाय भारताचा खालच्या फळीतील फलंदाज वॉशिंग्टन सुंदरने ३४ चेंडूंचा सामना करताना २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने३४  धावा केल्या. त्याच्याशिवाय गोलंदाज दीपक चहरने३८  चेंडूत ३८ धावा केल्या. चहरने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारही मारले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप