IPL २०२२ मध्ये आला आहे हा नवा नियम, या कारणामुळे संपूर्ण टीम जाऊ शकते IPL बाहेर!

IPL२०२२  ची २६ मार्चपासून धमाकेदार सुरुवात होणार आहे. आणि आयपीएलच्या सर्व फ्रँचायझी जोमाने त्यांच्या तयारीत गुंतल्या आहेत. याशिवाय मंडळही तयारीत व्यस्त आहे. आयपीएलबाबत दररोज नवनवीन नियम बनवले जात आहेत. इतकंच नाही तर २०११ नंतरचा हा पहिलाच आयपीएल सीझन असणार आहे, ज्यामध्ये ८ नाही तर १० टीम एकमेकांशी मैदानात लढताना दिसणार आहेत. यासह सर्व संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका गटात ५-५ संघांचा समावेश करण्यात आला आहे.

आणि अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे कळले आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केलेला नाही. आणि या नियमानुसार, आयपीएल २०२२ च्या सामन्यादरम्यान किंवा कोणत्याही वेळी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचा पातक संपूर्ण टीम ला बसू शकतो. जर टीम मधील एकजरी खेळाडू पॉसिटीव्ह आला तर ती संपूर्ण टीम काही काळासाठी वेगळी केली जाईल, मीडिया रिपोर्ट्समधूनच ही बातमी समोर आली आहे. मात्र अद्याप या वृत्ताला बोर्डाकडून अधिकृत दुजोरा किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. पण या बातमीबाबत बीसीसीआयकडून काही माहिती मिळाल्यास ही बातमी संघांसाठी खूप निराशाजनक ठरू शकते.

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

जसजशी आयपीएल जवळ येत आहे, तसतशी आयपीएलच्या तयारीलाही वेग आला आहे. आणि या क्षणी सर्व फ्रँचायझी आपापल्या संघांमध्ये संतुलन साधत आहेतआणि आता सर्वच संघानी आपल्या संघाची पूर्ण तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा संघ आहे.

याशिवाय यावेळी मुंबई इंडियन्सने ४ खेळाडूंना कायम ठेवण्याच्या प्रक्रियेत कायम ठेवले होते. याच मेगा लिलावादरम्यान, मुंबईने आपल्या संघात आणखी २१ खेळाडूंचा समावेश केलाआहे. तसेच आता यावेळी १० संघ मैदानात  एकमेकांसमोर उतरणार आहेत त्यामुळे आणखी जास्त टक्कर पाहायला मिळणार आहे. यंदाची संपूर्ण आयपीएल हि भारतामध्येच होणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप