या कारणाने बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर्स सहजपणे धुडकावून लावतात साऊथ इंडस्ट्रीचे हे मोठमोठे सुपरस्टार!

साऊथ सिनेइंडस्ट्री मध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या कलाकृती, वेगवेगळे विषय घेऊन सिनेमातून सादर होत राहतात. त्याच्या आगळ्या वेगळ्या विषयामुळे ते तिकडे तुफान हिट होतात! एवढे मोठे ब्लॉकबस्टर हिट की बॉलिवूड च्या दिग्दर्शकांना त्यावर हिंदीत चित्रपट काढू वाटतो!

साऊथ सिनेसृष्टीतील बहुतेक कलाकार हे सध्या बॉलीवुड च्या सुप्त आकर्षणामुळे तसेच त्यांच्या हिंदी चाहत्यांसाठी बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात पदार्पण करताना दिसत आहेत. आपल्या या लाडक्या सुपरस्टार कलाकारांना हिंदी चित्रपटांत पाहण्यासाठी प्रेक्षक देखील कमालीचे उत्सुक असतात. परंतु यामध्ये असे देखील काही कलाकार समाविष्ट आहेत ज्यांना बॉलीवुडच्या अनेक सुंदर ऑफर्स येत असतात, परंतु तरीदेखील हे कलाकार बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेतील सुपरडुपरहिट चित्रपटांत काम करण्यासाठी चक्क नकार कळवतात!

या लेखातून आपण अशाच काही साऊथ इंडस्ट्री मधील सुपरस्टार्सची माहिती जाणून घेणार आहोत! यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचत रहा!

१) अल्लू अर्जुन : पुष्पां सिनेमातील अभिनेता अल्लू अर्जुन हा साऊथ इंडस्ट्रीमधील एक खूप मोठा स्टार आहे. मात्र असे असून देखील त्याने अजूनपर्यंत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री मारलेली नाहीये. तुम्हांला बहुतेक ठाऊक नसेल की, अल्लू अर्जुन ला “बजरंगी भाईजान” आणि “83” यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची ऑफर आधीच देण्यात आली होती.

मात्र त्याने हे चित्रपट करण्यास अगदी बेधडकपणे नकार कळवला होता. मल्ल्याळम फिल्मस्टार दुलकर सलमान, तापसी पन्नू, विक्की कौशल आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपचा “मनमर्जिया” या चित्रपटातून देखील तो इतर हिंदी प्रेक्षक चाहत्यांपर्यंत पोहोचणार होता. अस म्हणतात की त्याने हा चित्रपट साइन सुद्धा केला होता. परंतु तेव्हाच नेमके अभिषेक बच्चन ची वर्णी त्याच्या जागी लागली.

२) महेश बाबू : अभिनेता महेश बाबू याची देखील साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याच्या चाहत्यांची जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे. मात्र त्याने देखील बॉलीवुड मध्ये आजपर्यंत कधीही काम केले नाही. चंदेरी दुनियेतील चित्रपटांच्या ऑफर्स तर महेश बाबूला कायमच येत राहतात. परंतु तो दरवेळी या सर्व ऑफर नम्रपणे नाकारतो.

View this post on Instagram

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

३) “अर्जुन रेड्डी” या चित्रपटातुन प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळवणारा चॉकलेट बॉय अभिनेता विजय देवरकोंडावर साऊथच नव्हते तर बॉलिवूड मधल्या मुली देखील जबरदस्त फिदा आहेत! उत्तर भारतात देखील त्याची प्रचंड क्रेझ आहे. गीता गोविंदम या चित्रपटानंतर यशराज फिल्म्स विजय देवरकोंङा याला त्यांच्या फिल्म मध्ये स्टार म्हणून कास्ट करणार होते. मात्र त्याने सुद्धा या ऑफरसाठी नकार कळवला.

३) अनुष्का शेट्टी : अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्याची जितकी स्तुती करू तितकी कमीच आहे. आपल्या अप्रतिम दमदार अभिनयामुळे आतापर्यंत तिला कितीतरी बॉलीवुड चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. परंतु प्रत्येकवेळी तिने त्या ऑफर्सना नकार कळवला. इतकंच नव्हे तर अजय देवगण च्या “सिंघम” चित्रपटाच्या हिरोईन साठी देखील अनुष्काला विचारण्यात आले होते.

४) रश्मीका मंदाना : भारताची नॅशनल क्रश म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ही अभिनेत्री आता जरी बॉलीवुड सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत असली तरीही तिने शाहीद कपूरचा “जर्सी” हा चित्रपट करण्यास नकार कळवला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप