थ्री इडियट्स’ मधून झळकलेला हा मराठमोळा कलाकार सापडलाय आर्थिक अडचणीत!चाहत्यांकडे करत आहे मदतीची मागणी…!

थ्री इडियट्स’ हा चित्रपट बॉलिवूडसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांसह बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. अभिनेता आमीर खान, आर.माधवन, शर्मन जोशी यांच्यासह अभिनेत्री करीना कपूर, अभिनेते बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात बोमन इराणी यांच्या पसर्नल असिस्टंट ‘गोविंद’चे पात्र ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र पटवर्धन यांनी साकारले होते.

पण राजेंद्रजी त्यानंतर चित्रपटातून फारसे झळकताना दिसले नाहीत. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पटवर्धन हे कठीण काळातून जात आहेत. ते अत्यंत आजारी असून त्यांच्यावर आता आर्थिक संकट देखील कोसळले आहे. म्हणूनच चाहत्यांकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.

‘मराठी नाट्य कलाकार संघ’ या फेसबुक ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून एक पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे. यात प्रसिद्ध कलाकार राजेंद्र पटवर्धन हे आजाराने ग्रस्त आहेत, असे सांगण्यात आले आहे. त्यासोबत त्यांना नेमकं काय झालंय हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टद्वारे त्यांनी त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची सांगितले आहे.

त्यांच्यावतीने लिहिण्यात आलंय ते अस की,

“मला काही बोलायचे आहे, सांगायचे आहे…मी एक साधा माणूस. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटक केलेला पण मी सेलिब्रिटी नाही. मी एक नट, उत्तम संस्थेत काम केलेले आहे..उदा. विनय(सर) आपटे बाकी मी काही बोलणार नाही…कारण आज माझा दिवस नाही
याचे कारण आमचा एक मित्र राजू पटवर्धन (राजू पटवर्धन माझ्याबरोबर “अपराध मीच केला”, या नाटकात होते. असो!

आत्ता ते खूप आजारी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक पाय मांडीपासून कापला गेला आहे…आता त्याचा उजवा हात देखील निकामा झाला आहे. हा आता भरारी अपंगालयात आहे, तो एकटा, अविहाहित आहे . वय साठीच्यापेक्षा जास्त. मी व माझा मित्र प्रसिध्द दिग्दर्शक,लेखक, निर्माता श्री अमोल भावे आम्ही त्याच्यासाठी पैसे गोळा करत आहोत.

हे अपंगालय म्हणजे. भरारी अपंगालय…मानपाडा गाव, उंबरली रोड, साई धारा टॉवर्स, डोंबिवली पूर्व इथे आहे गरज आहे ती आर्थिक मदतीची…आत्तापर्यंत मी, अमोल भावे, संध्या म्हात्रे, प्रसन्ना आठवले, दीपक परुळेकर, शेखर जोशी, संध्या दानव, काका हरदास व इतर अनेक मदत करत आहेतच आपणही करावी..फार नाही किमान शंभर पाचशे हजार जास्त नको!”

राजू पटवर्धन यांनी शेवटची भूमिका हिंदी चित्रपट थ्री ididiats व मराठीमधे भिकारी आणि टपाल या सिनेमांमध्ये केली होती.ज्यांना कुणाला यांना मदत करायची असेल त्यांनी मला कळवा. त्यांचे डिटेल्स मी त्यांना जरूर देईन. माझा नंबर 9892122214. खाली कमेंट्स मधे मी त्यांचा नंबर व बँक खात्याचे डिटेल्स देत आहे. गुगल पे नाही. मदत करण्यासाठी बँक खात्याचा तपशील

RAJANDRA MANOHAR PATWARDHAN
TJSB SAHAKARI BANK
A/C NO – 002110100016259
BRANCH – THANE ( WEST )
IFSC CODE – TJSB0000002

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप