या व्यक्तीने टीम इंडियाच्या कोच पदा वरून शास्त्रींना काढले, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटर ने केला आरोप..!

गेल्या दोन महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये बरेच काही बदलले आहे. विश्वचषक २०२१ मधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये बरेच बदल झाले आहेत. प्रशिक्षक बदल असो की कर्णधार बदल झाले आहेत. या बदलांनंतरही भारतीय क्रिकेटमध्ये सर्व काही ठीक चाललेले नाही. टीम इंडियाच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असून यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ याने बॉ’म्ब फो’डण्याचे काम केले आहे. त्याने बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत.

शास्त्रींना हटवण्यात गांगुलीचा हात आहे : पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने खळबळजनक दावा केला आहे. सौरव गांगुलीनेच रवी शास्त्री याला प्रशिक्षकपदावरून हटवले आणि हे सर्व विश्वचषकापूर्वी सुरू झाले होते. विशेषत: अनिल कुंबळेला चुकीच्या पद्धतीने प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर त्याची सुरुवात झाली होती. रवी शास्त्री याच्याकडे कोणताही कोचिंग कोर्स नाही पण असे असूनही तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनला होता.

विश्वचषकापूर्वी ही योजना आखण्यात आली होती : पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ पुढे म्हणाला, अनिल कुंबळेने ६०० हून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड हे त्याचे सहकारी होते आणि हे त्रिकूट खूप मजबूत आहे. अर्थ स्पष्ट आहे, गांगुलीने शास्त्रींना सांगितले बॉस, निघण्याची वेळ आली आहे. रवी शास्त्री याला प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ कायम ठेवायचा असला तरी विश्वचषकापूर्वी त्याला हटवण्याची योजना आखली जात होती. हा एक प्रकारचा वैयक्तिक हल्ला आहे आणि त्याचा भारतीय क्रिकेटवर परिणाम झाला आहे.

जे पाकिस्तानचे झाले तेच आज भारताचे होत आहे. : रशीद लतीफ याने असेही म्हटले की १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानसोबत असेच काही घडले होते आणि भारतीय क्रिकेटमध्येही तेच घडत आहे. मैदानाबाहेर घडणाऱ्या घटनांचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो आणि त्यामुळेच भारतीय संघ विश्वचषकात चांगला खेळू शकला नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेतही असेच काहीसे पाहायला मिळाले होते. रशीद लतीफ याच्या या विधानात एकही तथ्य नाही. विश्लेषक म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली होती. राहुल द्रविड (राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक) याची बीसीसीआयच्या दोन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) एकमताने निवड केली होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप