पंजाब मधील हा खेळाडू पोहचला रातोरात आपल्या मायदेशी, पोहचताच दुसऱ्या दिवशी ठोकले शतक.!!

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरले आहेत.

जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे जिथे ४ संघ गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल फायनलमध्ये पोहोचण्यासाठी स्पर्धा करतील.

रविवारी, या हंगामाच्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव करून विजयासह त्यांच्या हंगामाचा शेवट केला. पंजाब किंग्जचा हा मोसम अनेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळाले.

त्यापैकी एक खेळाडू होता श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज भानुका राजपक्षे. पंजाब किंग्जसाठी त्याने फार काही केले नाही पण तो महत्त्वाचा खेळाडू मानला जात असे. पंजाब किंग्जसाठी त्याने या मोसमात ९ डावात २०६ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ४३ होती. मात्र आयपीएलमधून बाहेर पडताच त्याने जबरदस्त वेगवान फलंदाजी करताना दाखवले. भानुका आज सकाळीच श्रीलंकेत पोहोचला होता आणि श्रीलंकेत पोहोचताच तो आंतर क्लब सामना खेळण्यासाठी निघून गेला. भानुका राजपक्षे बीआरसी क्लबकडून पनादुरा क्लबविरुद्ध खेळले.

भानुकाने उत्कृष्ट फलंदाजी करताना 56 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. राजपक्षे यांचे हे टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक होते. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरातही तो आयपीएल खेळला तरी त्याची कामगिरी कशी होईल हे पाहण्यासारखे ठरेल.

श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज भानुका राजपक्षे आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करत होता. लीग टप्पा संपल्यानंतर लगेचच, भानुका त्याच्या मायदेशी श्रीलंकेला परतला आणि दुसऱ्याच दिवशी तो आंतर-क्लब सामना खेळण्यासाठी आला. या सामन्यात त्याने झटपट खेळी करताना शतक झळकावले. या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पाडला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप