या खेळाडूच्या मागे होती साडे साथी, Covid झाला, आता IPL मध्ये करतोय कहर, त्याची टी-२० विश्वचषकावर आहे नजर..!

IPL २०२२ पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने स्वतःला ज्या प्रकारे सादर केले ते कोणालाही आवडले नाही. संघाने डेव्हिड वॉर्नरला वगळले, जे खूप वाईट होते. लिलावात त्यांच्या प्रशिक्षक कर्मचार्‍यातील प्रमुख सदस्य सायमन कॅटिच संघातून बाहेर गेला कारण त्याच्या मते खेळाडू विकत घेतले गेले नाहीत. अगदी दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन म्हणाला की सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२२ मध्ये देवाच्या भरोश्या वर असेल. पण हैदराबाद ने दुसऱ्या पराभवा नंतर सलग पाच विजय मिळवत स्वतःला विजयाच्या मार्गावर आणले आहे. संघाची फलंदाजी चांगली असून गोलंदाजीही चांगली होत आहे. प्रत्येक सामन्यात नवीन स्टार पुढे येत आहेत.

मागील सामन्यात हैदराबादने आरसीबीला केवळ ६८ धावांत गुंडाळून उर्वरित संघांनसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. येथे मार्को येन्सनने एका ओव्हर मध्ये तीन विकेट घेत विजयाचा रस्ता तयार केला होता. टी नटराजनने ही ३ षटकांत १० धावांत ३ बळी आणि भुवनेश्वर कुमारने २.१ षटकांत ८ धावांत १ बळी घेतला होता. नटराजन याने हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांना क्लीन बोल्ड केले होते. महान फलंदाज सुनील गावस्कर यानेही टी नटराजनचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by SunRisers Hyderabad (@sunrisershyd)

फलंदाज सुनील गावस्कर ने टी नटराजनचे कौतुक करताना सांगितले की, दुखापतीतून सावरल्या नंतर डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएल २०२२ मध्ये आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. गावस्कर म्हणाला की भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नटराजन निश्चितच प्रबळ दावेदार असेल आणि हा वेगवान गोलंदाज या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या T-२० विश्वचषकावर आपले लक्ष केंद्रित करत आहे.

नटराजन आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पर्पल कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ७ सामन्या मध्ये १४.५३ च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या आहेत. तामिळनाडूच्या या वेगवान गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबाद कडून ३ बळी घेतले होते त्यात ग्लेन मॅक्सवेलचा ही समावेश होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांवर आटोपला होता, ही त्यांची आयपीएल इतिहासातील पाचवी सर्वात कमी धावसंख्या होती.

नटराजनने चांगल्या गतीने गोलंदाजी केली आहे आणि एसआरएचसाठी पॉवरप्ले आणि डेथ या दोन्ही मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. गावसकर ने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, सर्वांना माहित आहे की यॉर्कर ही त्याची खासियत आहे पण त्याने चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवले आहे. त्याला परत येताना पाहून बरे वाटले कारण भारतीय क्रिकेटने त्याला गमावल्या सारखे काही काळा साठी वाटत होते.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप