टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या अनुभवी खेळाडूंना या मालिके साठी विश्रांती देण्यात आली आहे, तर दुसरीकडे या मालिके साठी अनेक युवा आणि अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. या संघात एक खेळाडू असाही आहे जो काही काळा पासून फ्लॉप ठरला असून ही मालिका या खेळाडू साठी टी-२० विश्वचषकाचे तिकीट मिळवण्याची शेवटची संधी ठरू शकते.
दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिके साठी युवा फलंदाज इशान किशनचा ही टीम इंडिया मध्ये समावेश करण्यात आला आहे. ईशानला काही काळा पासून चांगली कामगिरी दाखवता आली नाही आणि आयपीएल मध्ये तो काही खास दाखवू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याची खराब कामगिरी टीम इंडिया साठी अडचणी आणू शकते. इशान किशनला या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा भाग बनायचे असेल तर त्याला या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल.
View this post on Instagram
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळणारा युवा फलंदाज इशान किशन या मोसमात विशेष काही करू शकला नाही. या मोसमात त्याच्या बॅटने १४ सामन्यात ३२.१५ च्या सरासरीने केवळ ४१८ धावा आल्या होत्या. हा सीझन मुंबई इंडियन्स साठी कोणत्याही दुःस्वप्नापेक्षा कमी न्हवता. इशान किशन ही या मोसमात जवळपास फ्लॉप ठरला. त्याला त्याच्या नावा प्रमाणे कामगिरी करता आली नाही.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिके सोबत ५ सामन्यांची T-२० मालिका खेळायची आहे, ज्याचा पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम वर होणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धे साठी टीम इंडिया मध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्या साठी इशान किशनला मोठी आणि टिकाऊ खेळी खेळण्याची गरज आहे. या मालिकेत तो पुन्हा एकदा अयशस्वी ठरला तर टी-२० विश्वचषका साठी टीम इंडियातील त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते. ईशान किशनने २०२१ साली टीम इंडिया साठी पदार्पण केले होते, त्यानंतर त्याने ३ वनडे मध्ये २९.३ च्या सरासरीने ८८ धावा केल्या होत्या, तर T-२० मध्ये त्याने १० सामन्या मध्ये ३२.१ च्या सरासरीने २९ धावा केल्या आहेत.