मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने TNPL मध्ये केली दहशत, ७ पैकी ५ सामन्यात झळकावले अर्धशतक..!

तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू दहशत निर्माण करत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे, ज्याने भारतीय क्रिकेटला एका पेक्षा एक मोठे क्रिकेटपटू दिले आहेत. ही एक अशी स्पर्धा आहे जिथे खेळण्याचे प्रत्येक भारतीय क्रिकेटचे स्वप्न असते. इथ पर्यंत पोहोचण्या साठी क्रिकेटपटूंना खूप प्रयत्न करावे लागतात. मेहनती च्या जोरा वर आयपीएल मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या खेळाडूचे शेवटचे आणि सर्वात मोठे स्वप्न असते ते आपल्या देशाच्या संघा सोबत खेळणे.

View this post on Instagram

A post shared by Sy (@sanjayyadavr4)

मात्र आयपीएल मध्ये निवड झाल्या नंतर ही अनेक खेळाडू संपूर्ण हंगाम बेंच वर बसून घालवतात. संघ या खेळाडूं कडे दुर्लक्ष करतात. आम्ही तुम्हाला अशा खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्याने IPL २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स साठी फक्त एकच सामना खेळला होता, पण आता हा खेळाडू TNPL मध्ये जोरदार कामगिरी करत आहे.

खरे तर राष्ट्रीय स्तरा वर आयपीएल प्रमाणे लोकप्रिय होत असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये संजय यादव ने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तमिळनाडू प्रीमियर लीग च्या ७ सामन्या पैकी संजय यादव ने ५ सामन्यां मध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आपल्या बॅट ने ४ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. या २७ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने नेल्लई रॉयल किंग्स साठी धडाकेबाज खेळी खेळताना केवळ १५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, त्याला केवळ एका सामन्यात संधी दिल्या नंतर, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स ने संपूर्ण हंगामात कधीही त्याच्या नावाची चर्चा केली नाही. आज संजय यादव ज्या पद्धती ने टीएनपीएल मध्ये आपल्या धमाकेदार फॉर्मची झलक दाखवत आहे, त्यावरून असे म्हणता येईल की, आयपीएल च्या पुढील हंगामात त्याला अनेक सामने खेळण्याची संधी मिळू शकते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप