या भारतीय लोकप्रिय खेळाडूंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त १ विकेट घेतली आहे..!

कारकिर्दीतील पहिली विकेट हा सर्व खेळाडूं साठी एक खास क्षण असतो. भारताच्या काही लोकप्रिय खेळाडूंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फक्त एकच विकेट घेता आली. आज आम्ही तुम्हाला अशा लोकप्रिय भारतीय क्रिकेटर्स बद्दल सांगणार आहोत ज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये फक्त एक विकेट घेतली आहे.

रोहन गावस्कर
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्करचा मुलगा रोहन गावस्कर यानेही या यादीत नाव नोंदवण्यात यश मिळवले आहे. २००४ व्हीबी मालिकेत त्याने वनडेत एकमेव विकेट घेतली होती. त्याने अँड्र्यू सायमंड्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. रोहनने भारता साठी ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या खात्यात १८.८७ च्या सरासरीने १५१ धावा जमा केल्या आहेत. यादरम्यान त्याने अर्धशतक झळकावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Gavaskar (@rohangavaskar154)

एमएस धोनी
एमएस धोनीची गणना जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजां मध्ये केली जाते. त्याने काही प्रसंगी गोलंदाजी केली, परंतु केवळ एक विकेट घेण्यात त्याला यश आले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ मध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू ट्रॅव्हिस डॉलिनला बाद करून त्याने हा पराक्रम केला होता. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दी बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ३५० सामने खेळले आहेत आणि ५०.५८ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर १० शतके आणि ७३ अर्धशतके आहेत.

संजय मांजरेकर
माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने एकदिवसीय क्रिकेट मध्ये फक्त आठ चेंडू टाकले आणि त्या आठ चेंडूं मध्ये एक विकेट घेतली. बेन्सन अँड हॉजेस वर्ल्ड सीरीज १९९१ मध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज डीन जोन्सला बाद करून त्याने ही विकेट मिळवली होती. संजय मांजरेकरच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने ७४ सामने खेळले आहेत आणि ३३.२३ च्या सरासरीने १९९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने १ शतक आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत.

सय्यद किरमाणी
यष्टिरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी हा १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. पाकिस्तान विरुद्ध च्या कसोटी सामन्यात किरमाणीने अजीम हाफीजला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. किरमाणीच्या कसोटी कारकिर्दी बद्दल बोलायचे तर, त्याने ८८ सामन्यां मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना २६.७९ च्या सरासरीने २७५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने २ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत.

 

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप