आईपीएल २०२२ (IPL २०२२) चा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात नवी मुंबई तील DY पाटील स्टेडियम वर खेळला गेला होता, जिथे CSK ने तीन गडी राखून सामना जिंकला होता. या सामन्यात कर्णधार रवींद्र जडेजा ने नाणे फेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार म्हणून रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा आमने सामने होते. प्रथम फलंदाजी करताना MI ने टिळक वर्मा च्या शानदार अर्धशतका च्या जोरा वर २० षटकात ७ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि CSK समोर विजया साठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात सी एस के ने धोनी च्या शानदार फलंदाजी च्या जोरा वर २० षटकांत ७ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या.
आयपीएल च्या इतिहासात एमआय चे दोन्ही सलामीवीर खाते न उघडता पॅव्हेलियन मध्ये परतण्या ची ही दुसरी वेळ आहे. पहिली जोडी ल्यूक रोंची आणि जेपी ड्युमिनी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स ईस्ट लंडन २००९. दुसरी जोडी रोहित शर्मा आणि ईशान किशन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज मुंबई, डीवाय पाटील स्टेडियम २०२२.
View this post on Instagram
या सामन्यात MI कर्णधार रोहित शर्माने दोन चेंडूंचा सामना केला आणि ० धावांवर मुकेश चौधरीचा बळी ठरला होता. यासह रोहित ने आपल्या नावा वर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला आहे. तो आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा ० धावा काढून बाद होणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा १४ वेळा गोल्डन डकचा बळी ठरला आहे. त्याच्या शिवाय रहाणे, पार्थिव, रायुडू, मनदीप, हरभजन आणि पियुष चावला यांच्या नावा वर १३-१३ वेळा ० वर आऊट होण्याचा विक्रम आहे.
CSK गोलंदाजांनी पॉवरप्ले मध्ये त्यांच्या शेवटच्या ३ सामन्या मध्ये प्रत्येकी ३ बळी घेतले आहेत. या मोसमातील पहिल्या ४ सामन्यात त्याच्या खात्यात पॉवरप्ले मध्ये फक्त एक विकेट होती. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा धावांचा पाठलाग करताना शेवट च्या चेंडू वर विजय मिळवणारे संघ पुढील प्रमाणे आहेत.
८ चेन्नई सुपर किंग्ज
६ मुंबई इंडियन्स
४ राजस्थान रॉयल्स
३ पंजाब किंग्स / RCB
IPL मध्ये धोनी विरुद्ध उनाडकट
३६ चेंडू
८३ धावा
१ वेळ बाहेर
स्ट्राइक रेट २३०.५५