IPL मध्ये तब्बल ९ वर्षांनी खेळताना दिसणार हा स्टार खेळाडू ! ज्याने भारताला जिंकून दिलेला ‘वर्ल्डकप’

एका अहवालानुसार सगळ्यात जास्त क्रिकेटप्रेमी भारतामध्ये असल्याचे सांगितले गेले आहे. देशाचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रीडा प्रेमींचे झुकते माप कायमच क्रिकेटकडे राहिले आहे. भारतात खेळामध्ये क्रिकेट सर्वात जास्त प्रसिद्ध आहे . आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा गल्लीबोळात रंगणारा क्रिकेटचा सामना, सगळीकडेच क्रिकेट उत्साहात पाहण्यात येते. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर भारतीय संघ विजयश्री मिळवत कायमच चमकत असतो.

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी ही बहुचर्चित नावे कायमच क्रिकेटविश्वात चमकत राहतात पण आज आम्ही तुम्हाला या लेखातून अशाच एका खेळाडूची माहिती सांगणार आहोत.

BCCI कडून आयोजित करण्यात येणाऱ्या IPL ची धूम कायमच क्रिकेटप्रेमीं मध्ये पसरलेली दिसते. जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. या लीगमधून मिळणारी संपत्ती आणि प्रसिद्धी हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जाते. तसेच सर्व परदेशी खेळाडू देखील अनेकदा या लीगमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात आणि अनेक वेळा त्यांच्या देशाच्या संघात परततात. याच आशेने भारताचा महान वेगवान गोलंदाज एस श्रीसंतनेही (shreesant) यंदाच्या मेगा लिलावाच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.

श्रीसंतने कमी किमतीत आपले नाव दिले आहे, त्यामुळे त्याला संघ खरेदी करण्याची अपेक्षा आहे. आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी श्रीसंतने आपले नाव नोंदवले आहे. या खेळाडूने शेवटचा सामना २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळली होती.

ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी श्रीसंतने त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली आहे. गेल्या वेळी हा खेळाडू निवडला जाऊ शकला नाही. कारण त्याने त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली होती. श्रीसंतची मूळ किंमत कमी आहे आणि त्यामुळे कदाचित काही संघ त्याला खेळण्याची संधी देऊ शकतात.

एस श्रीसंत आयपीएल २०१३ दरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात दोषी आढळला होता, त्यानंतर त्याच्यावर न्यायालयाकडून आजीवन बंदी घालण्यात आली होती. परंतु, केरळ उच्च न्यायालयाने ती बंदी उठवली आणि ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत २०२० मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये आता परतला आहे. श्रीसंतने आयपीएलसाठी नोंदणी देखील केली होती, परंतु बीसीसीआयने त्याला लिलावासाठी निवडले नाही.

View this post on Instagram

A post shared by Sree Santh (@sreesanthnair36)

वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचा आगामी रणजी करंडक स्पर्धेसाठी २४ जणांच्या केरळ संघात समावेश करण्यात आला आहे. पण कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ३८ वर्षीय खेळाडू तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. श्रीसंतने शेवटचा प्रथम श्रेणी सामना २०१३ मध्ये खेळला होता.

बीसीसीआय १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित करणार आहे. आयपीएलचा हा शेवटचा मेगा लिलाव असू शकतो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास, परदेशी प्रवासावर निर्बंध येऊ शकतात, ज्यामुळे आयपीएल भारतामध्ये होऊ शकते. या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ असतील कारण लखनऊ आणि अहमदाबादचे नवीन संघ जोडले गेले आहेत.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप