टीम इंडियात निवड होणं जितकं कठीण आहे, तितकंच कठीण आहे, टीममधलं आपलं स्थान टिकवून ठेवणं. असे अनेक खेळाडू आहेत जे टीम इंडियाच्या आत आणि बाहेर जात असतात. यादरम्यान, एक भारतीय खेळाडू असा आहे जो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. पण यासाठी टीम इंडियाचे दरवाजे आता कायमचे बंद झाले असून त्या खेळाडूचे नाव आहे मनीष पांडे जो आपल्या खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे. त्याला अनेक संधी देण्यात आल्या पण प्रत्येक वेळी तो फ्लॉप ठरला.
मनीष पांडे सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. अनेकवेळा त्याला टीम इंडियामध्ये संधीही देण्यात आली होती, मात्र त्याच्या खराब कामगिरीमुळे संपूर्ण मिडल ऑर्डर डळमळीत होत होता. एक काळ असा होता जेव्हा या खेळाडूला भारतीय संघाचे भविष्य सांगितले जात होते पण आता मनीष पांडेची बॅट पूर्णपणे शांत झाली आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती. २०१६ पासून तो संघात आत व संघा बाहेर होत आहे. यासोबतच दुखापतीमुळे त्याच्या हातून अनेक संधी गेल्या आहेत. अशा परिस्थितीत तो कधीच टीम इंडियात पुनरागमन करू शकेल असे वाटत नाही.
मनीष पांडेचा खराब फॉर्म पाहता हैदराबादने त्याला रिटेन केलेले नाही. मात्र, यावेळी त्याला खरेदीदार मिळेल, अशी कमी आशा आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही हंगामांपासून तो धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. मनीष पांडेने RCB सोबत आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि २००९ मध्ये शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्याने ७३ चेंडूत नाबाद ११४ धावांची खेळी केली होत. त्यावेळी आरसीबीचा कर्णधार अनिल कुंबळे होता. यासोबतच मनीष पांडे केकेआरचाही भाग राहिला आहे.
मनीष पांडेने १४ जुलै २०१५ रोजी हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याच वेळी, १७ जुलै २०१५ रोजी हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० पदार्पण केले होते. मनीष पांडेने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण ३९ टी-२० सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याने एकूण ७०९ धावा केल्या आहेत. त्याची अलीकडची कामगिरी पाहता तो कधीही टीम इंडियात पुनरागमन करू शकेल, असे अजिबात वाटत नाही. यासोबतच आता त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजेही बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.