असा असेल SRH चा प्लेइंग इलेव्हन, हा खेळाडू IPL २०२२ मध्ये ओपनिंग करणार..!

IPL २०२२ चा सिजन २६ मार्च पासून सुरू होणार आहे. त्यासाठी आयपीएल च्या सर्व संघांनी जोरदार तयारी चालू केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने ही तयारीला वेग दिला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, IPL च्या पहिल्या रिटेनशन प्रक्रिये दरम्यान सनरायझर्स हैदराबाद ने ३ खेळाडूंना रिटेन केले होते. मेगा ऑक्शन बद्दल बोलायचे झाले तर सनरायझर्स हैदराबाद ने या लिलावात २० खेळाडू विकत घेऊन मजबूत संघ तयार केला आहे.

या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ कसा बघायला मिळू शकतो हे सांगणार आहोत. तुम्हाला सांगू इच्छितो की रिटेनशन प्रक्रिये दरम्यान सनरायझर्स हैदराबाद ने केन विल्यमसन, उमरान मलिक आणि अब्दुल समद यांना त्यांच्या संघात कायम ठेवले होते.

याशिवाय, संघाने मेगा लिलावात काही प्रसिद्ध आणि दिग्गज खेळाडूंचा ही संघात समावेश केला आहे. ज्या मध्ये वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, राहुल टियोटिया, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम यांसारख्या काही नावांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, मेगा लिलावा दरम्यान या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी या संघाने मोठी रक्कम खर्च केली आहे.

वॉशिंग्टन सुंदर – रु ८.७५ कोटी, निकोलस पूरन – रु १०.७५ कोटी, टी. नटराजन – रु ३.६ कोटी, भुवनेश्वर कुमार – रु ४.२० कोटी, प्रियम गर्ग – रु २० लाख, राहुल त्रिपाठी – रु ८.५० कोटी, अभिषेक शर्मा – रु ६.५ कोटी कार्तिक त्यागी – रु. ४ कोटी, श्रेयस गोपाल – रु ७५ लाख, जगदीश सुचित – रु २० लाख, एडन मार्कराम – रु २.६० कोटी, मार्को यान्सन – रु ४.२० कोटी, रोमारियो शेफर्ड – रु ७.७५ कोटी, शॉन ऍबॉट – रु २.४० कोटी, आर. समर्थ – २० लाख रुपये, सौरभ दुबे – २० लाख रुपये, शशांक सिंग – २० लाख रुपये, विष्णू विनोद – ५० लाख रुपये, ग्लेन फिलिप्स – १.५ कोटी रुपये, फजलहक फारुकी – ५० लाख रुपये

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन: राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), निकोलस पूरन (विकेट कीपर), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, कार्तिक त्यागी, टी नटराजन.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप