ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नीला जिवे मा’रण्याच्या ध’मक्या, म्हणाले- पाकिस्तानात जाऊ नका..!

पाकिस्तान विरुद्धची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील काही सदस्य आधीच पाकिस्तानात पोहोचले आहेत. पण या सगळ्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅश्टन एगर ची पत्नी मॅडेलीन ला जीवे मा’रण्याच्या ध’मक्या आल्या असून तिला पाकिस्तानात जाण्या पासून रोखण्यात आले आहे. पाकिस्तान ४ मार्च पासून ऑस्ट्रेलिया बरोबर कसोटी मालिका सुरू करणार आहे. येथे संघाला तीन कसोटी आणि एकदिवसीय व टी-२० सामना खेळायचा आहे. अॅश्टनला ही संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १९९८ नंतर प्रथमच पाकिस्तानात जात आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यांचे योग्य आयोजन करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. पण एगर च्या पार्टनर ला सोशल मीडियावर धमक्या आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला देण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड च्या वृत्तानुसार, टीमच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की एगर ला येथे जी’वे मा’रण्याची ध’मकी मिळाली आहे. मात्र, हा धो’का तितका गंभीर नसून तो एका बनावट इंस्टाग्राम अकाऊंट वरून पाठवण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड गेल्या वर्षी पाकिस्तान चा दौरा करणार होते पण दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी शेवटच्या क्षणी तो रद्द केला होता. न्यूझीलंडने सुरक्षे बाबत चिंता व्यक्त केली होती.

तब्बल २४ वर्षां नंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान च्या दौऱ्यावर जात आहे. पाकिस्तान मध्ये क्रिकेट च्या पुनरागमना साठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंड ने सामन्याच्या दिवशी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानला खूप अपमान सहन करावा लागला होता. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघाने आधीच कसोटी संघ जाहीर केला आहे, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही ३ वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

या ऑस्ट्रेलियन संघातून अनेक मोठी नावे गायब आहेत. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांच्या नावांचा समावेश नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सर्व खेळाडूंना विश्रांती दिली आहे. २९ मार्चपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने रावळपिंडीत खेळवले जाणार आहेत. पहिला एकदिवसीय सामना २९ मार्चला, दुसरा एकदिवसीय सामना ३१ मार्चला आणि तिसरा एकदिवसीय सामना २ एप्रिलला होणार आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप