आयपीएल २०२२ आता हळूहळू शेवट च्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रुप स्टेज चे सामने २१ मे रोजी संपतील, त्या नंतर प्लेऑफ सामने सुरु होतील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स वर खेळवला जाणार आहे. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामना ईडन गार्डन्स वर होणार आहे. त्या साठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे तुम्ही ऑनलाइन बुक करू शकता. आम्ही तुम्हाला तिकीटा ची किंमत आणि ते कसे बुक करावे या बद्दल सांगणार आहोत.
क्वालीफायर १- २४ मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)
एलिमिनेटर- २५ मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)
View this post on Instagram
IPL २०२२ चा क्वालिफायर-१ २४ मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम वर खेळवला जाणार आहे. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थाना वर पोहोचणारे संघ या वेळी आमने सामने असतील. क्वालिफायर १ जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थाना वरील संघ २५ मे रोजी भिडतील. एलिमिनेटर जिंकणारा संघ क्वालिफायर १ गमावणाऱ्या संघाचा सामना करेल. हा सामना (क्वालिफायर २) जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत क्वालिफायर १ च्या विजेत्याशी सामना करेल. मात्र, क्वालिफायर २ आणि फायनल गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर होणार आहे.
ईडन गार्डन्स सामन्या साठी तिकीट कसे बुक करावे-:क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर इडन गार्डन्स वर खेळवला जाणार आहे. इथे वेगवेगळ्या स्टँड च्या तिकीटा ची किंमत वेगळी आहे. तिकिटांची किंमत ८०० रुपया पासून ३ हजार रुपया पर्यंत आहे. तिकिटांची ५ श्रेणीं मध्ये विभागणी केली आहे. रु. ८००, रु. १०००, रु. १५००, रु. २००० आणि रु. ३०००. अशी या तिकिटांच्या किमती आहेत.
तिकीट कसे बुक करावे-:तिकीट बुक करण्या साठी, प्रथम बुक माय शो वर जा. त्यानंतर त्यामध्ये स्पोर्ट्स कॅटेगरी वर क्लिक करा. येथे क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा पर्याय दिसेल. तुम्हाला पहायचा असलेला सामना निवडा. तुम्हाला प्रथम मोबाईल नंबर/ ईमेल द्वारे पडताळणी करावी लागेल. खाली तुम्हाला BOOK लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला बुक कराय च्या असलेल्या तिकिटांची संख्या एंटर करा. त्यानंतर तुम्हाला ज्या किंमती चे तिकीट बुक करायचे आहे ते निवडा.