Mr इंडिया चित्रपटातील बालकलाकार टीना आता दिसते अशी! फोटो पाहून ओळखता देखील येता नाही…!

१९८७ साली भारतामध्ये मिस्टर इंडिया या वैज्ञानिक कथेवर असलेल्या एका चित्रपटाने धुमाकूळ घातलेला. नेहमीच्या मारधाड असलेल्या चित्रपटांपेक्षा याची कथा पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना हा चित्रपट आवडून गेला! त्या सालातील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलेला.. याची कथा, यातील गाणी, यातले जादूचे घड्याळ सर्व गोष्टींची प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातलेली.

हा चित्रपट अजून एका गोष्टींमुळे फेमस झालेला ते म्हणजे यातले बहारदार डायलॉग !! आणि यातली गाण्यांची गोडी आता २०२२ मध्ये देखील तेवढीच
लोकप्रिय ठरत आहे. ज्यामध्ये श्रीदेवीचा “मिस हवा हवाई” परफॉर्मन्स जगप्रसिद्ध ठरलेला. यातले मेन व्हिलन अमरीश पुरी यांचे “मोगॅम्बो खुश हुआ”, या सारखे डायलॉग बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध कोट्सपैकी एक आहे.!

खरंतर आजच्या या लेखात आम्ही एक विशेष माहिती सांगणार आहोत ती म्हणजे यातल्या एका गोड बालकलाकाराची! तसं तर या सिनेमात सर्वच लहान मुलांनी भारी काम केलं होतं. पण ‘टीना’ची भूमिका करणारी Huzaan Khodaiji हीचा रोल सर्वांच्या विशेष पसंतीस उतरलेला.

अनिल कपूरचा सिनेमा ‘Mr. India’ आजही लोकांना बघायला आवडतो. यात श्रीदेवी आणि लहान मुलांची मोठी फौज होती. हा सिनेमा आजही लहान मुलांना देखील बघायला आवडतो आणि या सिनेमात काम केलेली सर्वच लहान मुले आजच्या घडीला मोठी झाली आहेत आणि आपापल्या क्षेत्रात ते काम करत आहेत.

Huzaan Khodaiji ही तिच बालकलाकार आहे जिचा या सिनेमात एका बॉम्बस्फोटात मृत्यू होतो. सिनेमात टीनाने आपल्या निरागपणाने आणि गालावरील डिंपलने सर्वांची मनं जिंकली होती. आता हुजान खोदैजी खूप मोठी आणि तेवढीच ग्लॅमरस झाली आहे. हुजानचा एक लेटेस्ट फोटो समोर आला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, Mr.India नंतर हुजान दुसऱ्या कोणत्याच सिनेमात दिसली नाही. आता ती मार्केटींग फिल्डमध्ये काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, Huzaan Khodaiji लिंटास नावाच्या एका कंपनीत अॅडव्हरटायजिंग एक्झिक्यूटीव्ह म्हणून काम करत आहे. अर्थातच आता हुजान सिनेमांपासून दूर गेली आहे. पण तिच्या जादुई स्माइलची भुरळ लोकांच्या मनावर आज ही तितकीच ताजी आहे. हुजान आज ४१ वर्षांची झाली आहे आणि दोन मुलींची आई देखील आहे. मिस्टर इंडियात काम केलं तेव्हा ती केवळ ६ वर्षांची होती.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप