गुजरात टायटन्स (GT) कर्णधार हार्दिक पंड्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १५ व्या हंगामात त्याच्या फ्रेंचायझी साठी विजेते पद जिंकून इतिहास रचला आहे. यादरम्यान गुजरात च्या या शानदार विजया नंतर हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या ने इंस्टाग्राम पोस्ट द्वारे त्याचे कौतुक केले आहे.
विजेते पद मिळवण्या व्यतिरिक्त २८ वर्षीय खेळाडू हार्दिक ने या आयपीएल हंगामाचा फलंदाजी ने आनंद घेतला आहे. या मोसमात त्याने बॅट आणि बॉल ने कमाली ची कामगिरी केली आहे. मात्र आयपीएल २०२२ पूर्वी चे काही महिने हार्दिक साठी सोपे नव्हते. २०२१ च्या T-२० विश्वचषका पासून तो सतत टीम इंडिया च्या बाहेर होता आणि त्याच्या फिटनेस वर काम करत होता.
View this post on Instagram
यादरम्यान, हार्दिक बद्दल ची पोस्ट शेअर करत कृणाल पांड्या ने लिहिले की, माझ्या भावा, तुझ्या यशा मागे किती मेहनत आहे हे फक्त तुलाच माहीत आहे – सकाळी अनेक तासांचे प्रशिक्षण, शिस्त आणि मानसिक ताकद आणि तुला ट्रॉफी उचलताना पाहणे हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे. तुम्ही खूप जास्त पात्र आहात. जेव्हा लोकांना वाटले की तु संपला आहेस पण तु इतिहास लिहीत राहिलास. लाखाहून अधिक लोक तुझ्या नावाने हाक मारत असताना मी तिथे असायला हवे होते असे मला वाटते.
IPL २०२२ मधील हार्दिक पंड्या च्या कामगिरी बद्दल बोलायचे तर, या मोसमात फिनिशर ची भूमिका करण्या ऐवजी तो चौथ्या क्रमांका वर फलंदाजी करताना दिसला होता. या मोसमात GT कर्णधारा ने ४४.२७ च्या सरासरी ने ४८७ धावा केल्या आणि तो या स्पर्धेत भारतीय खेळाडूं मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याच बरोबर गोलंदाजीत ही त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत.
IPL २०२१ नंतर मुंबई इंडियन्स (MI) ने रिलीज केल्या नंतर, हार्दिक आणि कृणाल या हंगामात वेगवेगळ्या संघा साठी खेळताना दिसले होते. लिलावा पूर्वी हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स ने (जी टी) कर्णधार बनवले होते. त्याच वेळी कृणाल पांड्या ला लखनऊ सुपर जायंट्स (एल एस जी) ने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.