माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि सध्याचा आयसीसी पंच कुमार धर्मसेना याने त्याचा सर्वकालीन ११ संघ तयार केला आहे. त्याने आपल्या सर्वकालीन आवडत्या इलेव्हन मध्ये अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आहे. भारत आणि पाकिस्तान मधून केवळ १-१ खेळाडूची निवड करण्यात आली आहे.
View this post on Instagram
माजी उजव्या हाताचा ऑफ- स्पिनर कुमार धर्मसेना ची २०११ मध्ये ICC पंचांच्या एलिट पॅनेल मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्याने आपल्या बेस्ट ११ मध्ये ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि देशबांधव सनथ जयसूर्या यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. कुमारने तिसऱ्या क्रमांका साठी ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंगची निवड केली आहे. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पाँटिंग च्या नावावर आहे.
View this post on Instagram
चौथ्या क्रमांका साठी त्याने क्रिकेट चा देव म्हटल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ची एकमेव भारतीय खेळाडू म्हणून निवड केली आहे. शतक झळकावणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. त्याचवेळी, वेस्ट इंडिज कडून ब्रायन लाराला त्याच्या संघात ५ व्या क्रमांका वर फलंदाजी साठी निवडण्यात आले आहे, जो कसोटी सामन्यात ४०० धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.
View this post on Instagram
धर्मसेना ने सहाव्या क्रमांका साठी देश बांधव खेळाडू कुमार संगकाराची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिके चा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला संघात ७ व्या क्रमांका वर ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्याने पाकिस्तान मधून वसीम अक्रम या केवळ एका खेळाडूची निवड केली आहे.
View this post on Instagram
कुमार धर्मसेना ने हा त्याचा सार्वकालीन ११ संघ निवडला आहे तो पुढील प्रमाणे आहे-
मॅथ्यू हेडन, सनथ जयसूर्या, रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, कुमार संगकारा, जॅक कॅलिस, वसीम अक्रम, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा.
View this post on Instagram