भारताची देशांतर्गत रणजी ट्रॉफी २०२२ चा हंगाम सुरू होत आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र बऱ्याच विचारविनिमयानंतर बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धेला ग्रीन सिग्नल दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोठी बातमी समोर येत आहे की, अजिंक्य रहाणेला त्याच्या पेक्ष्या लहान खेळाडू च्या नेतृत्वा खाली खेळावं लागणार आहे चला तर पाहू कोण आहे खेळाडू.
रणजी ट्रॉफी २०२२ ला हिरवा कंदील मिळाल्यानंतर खेळाडू रणजी ट्रॉफीसाठी खूप उत्सुक आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे कर्णधारपद पृथ्वी शॉच्या हाती जाऊ शकते. भारताचा वरिष्ठ खेळाडू आणि माजी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील या संघाचा भाग असेल. मात्र रहाणेला पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे.
सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती येत्या दोन दिवसांत संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. रहाणे फलंदाज म्हणून संघाचा भाग असेल. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रहाणेचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, मात्र रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या जागी पृथ्वी शॉ ला कर्णधार बनवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवड समितीचे प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि असोसिएशनने रहाणेशी एकत्रितपणे चर्चा केली होती. यानंतरच पृथ्वी शॉला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
रहाणेसारख्या खेळाडूसाठी कर्णधारपद महत्त्वाचे नाही. क्रिकेटचा कर्णधार म्हणून जे साध्य करणे अशक्य आहे ते त्याने साध्य केले आहे. संघासोबत मेंटॉर म्हणून खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा नावलौकिक परत आणण्यासाठी तो तयार आहे. त्याला कर्णधारासोबत कोणतीही महत्त्वाची समस्या नाही. त्यांनाही कॅप्टन शॉची अडचण नाही.
अजिंक्य रहाणे हा भारतीय राष्ट्रीय संघाचा क्रिकेट खेळाडू चांगला खेळाडू आहे. रहाणे हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. रहाणेचा जन्म ६ जून १९८८ रोजी संगमनेर, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र, भारत येथे झाला. अजिंक्यचे वय ३४ वर्षे आहे. रहाणेने३१ ऑगस्ट २०११ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
रहाणे मुळातच सलामीवीर असून कोणत्याही परिस्थितीत फिट राहण्याची क्षमता त्याच्यात आहे. आणि रहाणे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले, जेथे फलंदाजीची सरासरी 57.60- इतकी कमी झाली आहे. परंतु राहणे हा एक उत्तम खेळाडू आहे. तो च्या सय्यमी खेळी साठी नेहमी ओळखला जातो.