आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार होणे ही एका मोठ्या जबाबदारी पेक्षा कमी नाही कारण जेव्हा तुम्ही संघाचे कर्णधार असता तेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करत असता. हा संघ भारत असेल तर ही जबाबदारी आणखीनच वाढते कारण भारतातील लोक क्रिकेटला धर्म मानतात. भारतीय कर्णधाराच्या भूमिकेत मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि ही जबाबदारी फारसे लोक हाताळू शकत नाहीत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरलाही कर्णधारपदाचा भार पेलता आला नाही. असे म्हटले जाते की, एक कर्णधार त्याच्या संघाइतकाच यशस्वी असतो, कर्णधाराचा पाठिंबा मिळाल्याने अनेक खेळाडूंचे करिअर बदलू शकते. खेळाडू चांगली कामगिरी करू लागतो, पण जर एखाद्याचा कर्णधार बदलला तर त्याच्या कामगिरीचा परिणाम त्या खेळाडूवरही दिसून येतो.
कुलदीप यादव: कुलदीप यादवने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले होते. कोहलीला या चायनामन खेळाडूला संघातून बाहेर काढायचे होते, असे अनेकदा बोलले जात होते, परंतु आकडेवारी या प्रकरणाची साक्ष देतात. आकडेवारी नुसार कोहलीच्या नेतृत्वाखाली कुलदीप यादवला भरपूर संधी मिळाल्या आहेत आणि कोहलीनेही त्याला संधी देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कुलदीपने २०१७ ते २०२१ या काळात कोहलीच्या नेतृत्वाखाली एकूण ७५ सामने खेळले आणि यादरम्यान त्याने १४० विकेट्सही घेतल्या आहेत, तर रोहितच्या नेतृत्वाखाली कुलदीपने १६ सामने खेळले आणि केवळ २६ विकेट घेतल्या आहेत. यासोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कुलदीप यादवला आता कमी संधी मिळत आहेत.
View this post on Instagram
मोहम्मद सिराज: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मोहम्मद सिराजने पदार्पण केले होते. सिराज आयपीएल मध्ये बेंगळुरू कडून खेळतो आणि तो कोहलीच्या खूप जवळचा असल्याचे बोलले जाते. चांगल्या कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी आणि एकदिवसीय संघातही स्थान मिळवले होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली, त्याने एकूण १० सामने खेळले आणि एकूण २४ विकेट घेतल्या, परंतु जेव्हा पासून रोहित शर्मा संघाचा कर्णधार बनला आहे, तेव्हा पासून त्याला कमी संधी मिळतात आणि जेव्हा संधी मिळतात तेव्हा सिराज कोणतेही चमत्कार दाखवू शकत नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली सिराजने एकूण ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ११ विकेट घेतल्या आहेत.
शार्दुल ठाकूर: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली शार्दुल ठाकूरने पदार्पण केले होते. जोपर्यंत कोहली संघाचा कर्णधार होता तो पर्यंत शार्दुलची कामगिरी अप्रतिम होती. त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स घेतल्या आणि संघाला विजया पर्यंत नेले होते. यासोबतच त्याने आपल्या फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले आहे, मात्र रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार झाल्या पासून शार्दुलच्या कामगिरीत घसरण पाहायला मिळत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली शार्दुलने एकूण ३६ सामने खेळले असून ५५ बळी घेतले आहेत, तर रोहितच्या नेतृत्वाखाली त्याला ११ सामन्यांत केवळ १३ विकेट घेता आल्या आहेत. आताही तो बॅटनेही अयशस्वी ठरला आहे. अशा स्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली त्याची कामगिरी घसरली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.