वानिंदू हसरंगा IPL इतिहासातील श्रीलंकेचा सर्वात महागडा खेळाडू ठरला, चक्क एवढ्या कोटींना खरेदी केला..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२२) चा मेगा लिलाव बंगळुरू येथे आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंत शिखर धवन, श्रेयस अय्यर, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा यांच्यासह अनेक खेळाडूंना खरेदी केले आहे. अजूनही असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्व फ्रँचायझींच्या नजरा आहेत. या लिलावात श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाचे नशीब चमकले आहे. त्याला बंगळुरू (RCB) संघाने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हसरंगाची मूळ किंमत १ कोटी होती. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किमतीत विकला जाणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय लीगमध्ये आतापर्यंत श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूला एवढी रक्कम मिळालेली नाही. हसरंगाने लसिथ मलिंगा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधर यांना मागे टाकले आहे.

वानिंदू हसरंगा गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या T-२० विश्वचषकात आपल्या चमकदार कामगिरीने चर्चेत आला होता. यानंतरही गेल्या अनेक मालिकांमध्ये दमदार कामगिरी करत हसरंगाने आयपीएल लिलावात आपला ठसा उमटवला होता. त्याची प्रतिभा पाहून अनेक संघांच्या नजरा श्रीलंकेच्या या खेळाडूवर होत्या. आता हसरंगा आयपीएल २०२२ मध्ये गोलंदाजी करताना दिसणार आहे. तो सध्या श्रीलंकेच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.

भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिकलसाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चांगलीच स्पर्धा होती. शेवटी, राजस्थान रॉयल्सने त्याला ७.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलाही राजस्थानने ८.५ कोटींना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. सलामीवीर क्विंटन डी कॉकला लखनौ फ्रँचायझीने ६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला ७.२५ कोटींना विकत घेतले आहे, आफ्रिकन गोलंदाज कागिसो रबाडाला पंजाब किंग्सने ९.२५ कोटी, शिखर धवनला पंजाब किंग्सने ८.२५ कोटी, आणि राजस्थान रॉयल्सने आर अश्विनला ५ कोटींना खरेदी केले आहे.

दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाला लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गेल्या मोसमापर्यंत तो चेन्नईसोबत होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथलाही आयपीएलमध्ये खरेदीदार मिळालेला नाही. धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरला कोणताही खरेदीदार सापडला नाही. हे सर्व खेळाडू दिग्गज आहेत, मात्र त्यांचे नशीब चांगले नसल्याने पहिल्या दिवशी त्यांना खरेदी करण्यात कोणीही रस दाखवला नाही.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप