ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राने या भारतीय गोलंदाजाचे केले तोंड भरून कौतुक, बुमराह पेक्षाही खतरनाक आहे हा गोलंदाज..!

IPL 2022 मध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. फिरकी गोलंदाजी असो की वेगवान गोलंदाजी असो, भारतीय गोलंदाजांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी ने सर्वांनाच चकित केले आहे. आयपीएल च्या १५ व्या हंगामात वेगवान गोलंदाजांनी क्रिकेट मधील अनेक दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा ने भारतीय वेगवान गोलंदाजा चे कौतुक केले आहे. जाणून घेऊया या भारतीय गोलंदाजा चे कौतुक करताना त्याने काय म्हंटले आहे.

ग्लेन मॅकग्राने भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा चे कौतुक केले आहे. तो शुक्रवारी म्हणाला की, प्रसिद्ध कृष्णा ने ज्या प्रकारे आयपीएल मध्ये १९ वे षटक टाकले, त्या वरून तो दबाव हाताळू शकतो हे दिसून येते. त्याच वेळी, मॅकग्रा ने आशा व्यक्त केली की भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जोरदार पुनरागमन करेल, ज्याने आता पर्यंत मुंबई इंडियन्स साठी आयपीएल मध्ये चार विकेट घेतल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prasidh Krishna (@skiddyy)

एम आर एफ पेस फाउंडेशन चे कोचिंग डायरेक्टर ग्लेन मॅकग्रा याने येथे पत्रकारांना सांगितले की, आमचे दोन गोलंदाज आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा ज्या पद्धती ने गोलंदाजी करत आहेत ते खूप प्रशंसनीय आहे. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध च्या आयपीएल सामन्या च्या १९ व्या षटकात या खेळाडू ने शानदार गोलंदाजी केली होती, या वरून हे खेळाडू दडपण हाताळू शकतात हे दिसून येते. मला नेहमीच प्रसिद्ध कृष्णा आवडतो कारण तो नेहमी नेट मध्ये गोलंदाजी करण्यास उत्सुक असतो. प्रशिक्षणा दरम्यान त्याने घेतलेली मेहनत फळाला येत आहे. तो मानसिक दृष्ट्या खूप मजबूत आहे आणि त्याची वृत्ती ही चांगली आहे. तो सध्या चांगली गोलंदाजी करत असून त्याच्यात आत्मविश्वास आहे.

यावेळी त्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स कडून आयपीएल खेळणाऱ्या जसप्रीत बुमराह बद्दल ही मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएल च्या या मोसमात जसप्रीत बुमराह ला आता पर्यंत जास्त बळी घेता आलेले नाहीत. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवाती च्या काळात त्याला इतके यश मिळाले आहे की त्याने तीच पातळी राखणे अपेक्षित आहे. तो एक उत्तम गोलंदाज आहे आणि खूप हुशार ही आहे. मी त्याच्या दमदार पुनरागमनाची वाट पाहत आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप