भारतीय दिग्गज खेळाडू मिताली राजने इंटरनॅशनल क्रिकेट मधून केली निवृत्तीची घोषणा..!

भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज फलंदाज मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. भारतीय संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या मिताली ने या वर्षाच्या सुरुवातीला खेळलेल्या महिला विश्वचषकाच्या रूपाने शेवट ची स्पर्धा खेळली होती. मिताली ने ट्विटर वर एका मोठ्या पोस्ट द्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे. मितालीने या पोस्ट मध्ये सर्वांचे आभार मानले आहेत.

मिताली ने लिहिले आहे की, लहानपणी मी निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहिले होते कारण माझ्या देशा साठी खेळणे ही माझ्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. माझा प्रवास अनेक यशांनी आणि काही अपयशांनी भरलेला आहे. गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान वर्षे आहेत. प्रत्येक प्रवासा प्रमाणे हा प्रवास ही संपायचा होता. आज तो दिवस आहे जेव्हा मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत आहे. प्रत्येक वेळी मी जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा मी भारताला सामने जिंकण्या साठी माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. भारता कडून खेळण्याची संधी मिळाल्या बद्दल मी नेहमीच आभारी राहीन.

मिताली ची एकदिवसीय कारकीर्द आश्चर्यकारक होती आणि ती महिला वनडेत सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू आहे. तिने १२ कसोटी आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने भारता कडून खेळलेल्या २३२ एकदिवसीय सामन्यांच्या २११ डावा मध्ये ७८०५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये तिने ५० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. महिला क्रिकेट मध्ये ६००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी मिताली ही एकमेव फलंदाज आहे.

मिताली ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये ६४ अर्धशतके झळकावली आहेत आणि महिला वनडे मध्ये ५० किंवा त्याहून अधिक अर्धशतके झळकावणारी ती एकमेव फलंदाज आहे. मिताली राज ने २०१९ मध्ये T-२० इंटरनॅशनल मधून निवृत्ती घेतली होती. तिने ८९ टी-२० सामन्या मध्ये १७ अर्धशतकांसह आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये एकूण २३६४ धावा केल्या आहेत, या फॉरमॅट मध्ये कोणत्याही महिला भारतीय खेळाडू कडून या सर्वाधिक धावा आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप