बुमराहला कसोटी कर्णधारपद दिल्यानंतर दिग्गज महेला जयवर्धनेने केले मोठे वक्तव्य..!

श्रीलंका क्रिकेटचा महान खेळाडू महेला जयवर्धनेला असे वाटते की, अलीकडच्या काळात आपल्या संघाचा संभाव्य कर्णधार म्हणून गोलंदाजांकडे पाहण्याचा कल बदलत आहे, विशेषत: अॅशेस मालिकेपूर्वी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार बनविण्यात आल्या नंतर कोविड मुळे नियमित कर्णधार रोहित शर्माला वगळण्यात आल्या नंतर एजबॅस्टन येथे इंग्लंड विरुद्ध च्या पुनर्नियोजित पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करेल, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली होती.

आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ वर श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजाने म्हटले आहे की, मला वाटते की, जर त्याला (बुमराहला) संधी मिळाली तर ते अविश्वसनीय आहे. आपण क्वचितच वेगवान गोलंदाजांना कर्णधारपदाची संधी दिली असेल कारण त्यांना खूप मेहनत करावी लागते, विशेषत: जेव्हा आपण कसोटी क्रिकेट खेळत असता.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

पण पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाच्या (कसोटी) कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्या मुळे आम्ही ट्रेंड बदल पाहिला आहे आणि एक गोलंदाज कॅप्टनसी करताना पाहून खूप आनंद झाला आहे. गोलंदाजांना खेळ कसा चालत आहे, काय करण्याची गरज आहे हे समजते आणि साहजिकच तुमची इच्छा विकेट घेणे आहे. खूप सकारात्मक राहावे लागते. त्यामुळे मला वाटते की हे (बुमराहसाठी कसोटी संघाचे नेतृत्व करणे) शानदार असेल.

बुमराह ची कसोटी क्रिकेट बद्दल ची आवड सांगताना जयवर्धने म्हणाला की, या खेळाडूला लाल चेंडूच्या क्रिकेट ची खूप आवड आहे. अनेक वर्षां पूर्वी जेव्हा त्याने भारता कडून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा आमच्यात ही बातचीत झाली होती आणि मुंबई च्या (मुंबई इंडियन्स) कॅम्प मध्ये आम्ही जितका जास्त वेळ घालवतो, तितका जास्त वेळ बुमराहला नेहमी लाल चेंडू च्या क्रिकेट बद्दल बोलायचं असतं, त्याला ते खूप आवडतं.

जयवर्धने पुढे म्हणाला की, कसोटी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेणारे वेगवान गोलंदाज तुमच्या समोर येतात हे विशेष आश्चर्य कारक आहे. तो प्रत्येक कसोटी मालिकेची वाट पाहत असतो. तो भारता साठी एकही कसोटी सामना गमावू इच्छित नाही, जो देशा साठी एक संपत्ती आहे कारण तो आपल्या कसोटी क्रिकेटला खूप प्राधान्य देतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप