भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियन येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत चांगला ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आजपर्यंत कोणत्याही आशियाई संघाने सेंच्युरियनमध्ये एकही कसोटी सामना जिंकला नव्हता, मात्र भारताने सेंच्युरियनमधील कसोटी सामना जिंकून इतिहास रचला आणि सेंच्युरियनमध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे.
२०२१ हे वर्ष भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगले होते. भारताने यावर्षी ब्रिस्बेन, लॉर्ड्स, ओव्हल आणि आता सेंच्युरियन येथे विजय मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. भारताने ब्रिस्बेनमधील कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची घमंड तोडली आणि नंतर लॉर्ड्स आणि ओव्हलवर विजय मिळवून इतिहास रचला.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अप्रतिम कामगिरी केली आहे आणि परदेशी भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि या भारतीय संघाला सर्वात हुशार भारतीय संघ देखील म्हटले जाते. सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर भारताने रिसॉर्टमध्ये पोहोचून जल्लोष साजरा केला. भारतीय संघ सेंच्युरियन येथील रिसॉर्टमध्ये मुक्काम करत असून तिथे पोहोचल्यावर भारतीय संघाने रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने रिसॉर्टमध्ये जाऊन रिसॉर्टच्या कर्मचार्यांसोबत जबरदस्त डान्स केला आणि सेलिब्रेशन केले. विराट कोहलीचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून प्रत्येकजण विराट कोहलीच्या डान्सचे कौतुक करत आहे. विराट कोहली त्याच्याच स्टाईलमध्ये डान्स करत असून रिसॉर्टचे कर्मचारीही त्याच्यासोबत नाचताना दिसत आहेत. विराट कोहली नेहमीच अशा विजयांचा आनंद साजरा करतो आणि सर्वांना त्याची शैली आवडते. विराट कोहली कर्णधार म्हणून भारताला कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक ऐतिहासिक विजय मिळवून देत आहे आणि अप्रतिम कामगिरी करत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा गड मानल्या जाणार्या सुपरस्पोर्ट पार्क येथील पहिल्या कसोटीत भारताने ११३ धावांनी विजय मिळवून २०२१ चा समारोप केला. दक्षिण आफ्रिकेत कुठेही कसोटी सामना खेळणे सोपे नाही आणि सेंच्युरियन हे निश्चितपणे सर्वात कठीण ठिकाण आहे असे कोहली म्हणाला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर वेगवान गोलंदाजांनी १८ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला हादरवून सोडले. कोहली म्हणाला, आम्ही चार दिवसांत विजय मिळवला आहे. आज आपण एक संघ झालो आहोत, जो आपल्या भक्कम बाजू उघडपणे दाखवतो याचाच हा पुरावा आहे.