टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळा पासून ऑफफॉर्म मध्ये आहे, पण एक वेळ अशी आली होती की, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम तो मोडू शकतो असे सर्वांना वाटत होते. मात्र, सचिन नंतर विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दुसऱ्या क्रमांकात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. सध्या कोहली त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे पण तो एकमेव असा क्रिकेटर आहे ज्याला अजूनही महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे सोडण्याची संधी आहे.
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतके झळकावून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला होता, जो मोडणे ही काही सोपी गोष्ट नाही, पण टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सचिनच्या या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पण गेल्या तीन वर्षां पासून तो त्याच्या खराब फॉर्म मध्ये असला तरी त्याच्या बॅटने त्याचे शेवटचे शतक २०१९ मध्ये आले होते. शतकांच्या बाबतीत विराट कोहली च्या नावा वर एकूण ७० शतके आहेत. सध्या तरी कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला विक्रमांच्या बाबतीत सचिनला मागे सोडण्याची संधी आहे.
View this post on Instagram
विराट कोहलीने २०१२ साली वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी टीम इंडिया साठी पदार्पण केले होते. अवघ्या एका वर्षात तो भारतीय संघा साठी सुपरस्टार बनला होता आणि त्या नंतर च्या ७ वर्षात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दबदबा निर्माण केला होता. विराट कोहली तरुण असतानाही सचिन च्या फलंदाजीची बरोबरी करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, ओकले येथील स्पोर्ट्स मार्केटिंगचे प्रमुख अश्विन कृष्णन यांनी अनेक वर्षां पूर्वी विराट कोहली च्या भेटीची आठवण सांगणारा एक किस्सा शेअर केला होता, जिथे विराटला विश्वास होता की तो एक दिवस सचिनचा रेकॉर्ड मॉडेल.
बर्याच वर्षां पूर्वी विराट कोहली सोबत झालेल्या भेटीची आठवण करून देत स्पोर्ट्स मार्केटिंगचे प्रमुख अश्विन कृष्णन यांनी ग्लान्स चॅट शोद्वारे एक मजेदार किस्सा सांगितला आहे- विराट कोहलीचा एकदिवसीय विक्रम अभूतपूर्व आहे. सचिनचा तो विक्रम तो कुठे पोहोचतोय की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. २०१३ मध्ये विराटला साईन करण्यासाठी आम्ही ओकलीला गेलो होतो.
विराट त्याचा मॅनेजर बंटी सोबत तिथे आला होता. मी चॅम्पियन्स लीग करत होतो आणि त्याला साइन करण्यासाठी खाली गेलो होतो. त्यावेळी तो २४ वर्षांचा होता आणि त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९ शतके झळकावली होती. तो तिथे म्हणाला– एकदिवसीय सामन्यांमध्ये मी पाजीला नक्कीच पकडेन. त्या वेळी पाजीने वनडे मध्ये ४९ शतके झळकावली होती. विराट कोहली सारखा खेळाडू कधीही फॉर्म च्या बाहेर जाऊ शकत नाही, असा विश्वास अश्विन कृष्णन यांनी व्यक्त केला आहे आणि कोहली वर विश्वास व्यक्त केला की लवकरच त्याच्या बॅट मधून धावा येऊ लागतील.