दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या टी-२० मालिकेत विराट कोहली टीम इंडियाचा भाग नाही, कारण आले समोर..!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली चा त्रास संपण्याचे नाव घेत नाही. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहली साठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, कोहली दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही .

इनसाइड स्पोर्ट्स च्या वृत्ता नुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती च्या एका निवडकर्त्या ने पुष्टी केली आहे की विराट कोहली दक्षिण आफ्रिका मालिका आणि आयर्लंड दौऱ्या साठी टीम इंडियाचा भाग असणार नाही. आता तो पुढील सिरिज इंग्लंड मध्ये टीम इंडिया कडून खेळताना दिसणार आहे.

इनसाइड स्पोर्ट्स शी बोलताना एका निवडकर्त्या ने सांगितले की, एखाद्या खेळाडू च्या खराब टप्प्यातून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे स्वाभाविक आहे. आम्हाला संघात युवा खेळाडूंना संधी द्यायची होती आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्यायची आहे. पण जर त्याला खेळायचे असेल तर आम्ही पाहू. संघ निवड बैठकी पूर्वी त्याच्याशी आम्ही चर्चा करू. या मालिकेत केवळ विराट कोहलीच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह सह इतर काही वरिष्ठ खेळाडूंना ही विश्रांती दिली जाऊ शकते असे निवडकर्त्या कडून सांगितले जात आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जून मध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्या वर जाणार आहे. पहिला T-२० सामना ९ जून ला दिल्ली येथे खेळवला जाणार आहे. दुसरा T-२० सामना १२ जून ला कटक येथे खेळवला जाणार आहे. तिसरा T-२० सामना १४ जून ला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. चौथा T-२० सामना १७ जून ला राजकोट येथे खेळवला जाणार आहे. पाचवा T-२० सामना १९ जून ला बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. अलीकडेच भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, जिथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. या दोन्ही मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आगामी टी-२० मालिके साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप