विराट कोहलीला या फलंदाजाचा खूपच गर्व आहे ,पण तो खेळाडू लवकरच होणार निवृत्त!

भारतीय क्रिकेट संघातील एक खेळाडू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय संघात सामील होणे जितके कठीण आहे, तितकेच संघात राहणे कठीण आहे. कारण संघातच नव्हे तर संघाबाहेरही असे अनेक खेळाडू आहेत, जे उत्कृष्ट कामगिरी करून अप्रतिम स्पर्धा देतात. पण भारताचा एक खेळाडू असाही आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली आहे आणि आता पुन्हा संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे. एके काळी या खेळाडूमध्ये सामना स्वतःच्या अंगावर फिरवण्याची क्षमता होती, त्यामुळे विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूला खूप अभिमान वाटायचा, पण आता त्याच्या निवृत्तीचे दिवस जवळ आले आहेत.

ज्याचा समावेश आता संघात खूपच कठीण दिसू लागला आहे. आणि आता त्यांना पुन्हा संघात सामील होणे अशक्य आहे. आम्ही बोलत आहोत, भारतीय संघाचा ३६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू केदार जाधव. आणि या सगळ्यानंतर आता केदारकडे संन्यास घेण्याचा एकच मार्ग उरला आहे. केदारने १६ नोव्हेंबर २०१४ रोजी श्रीलंकेविरुद्ध भारताकडून पदार्पण केले होते. आणि शेवटचा सामना ८ फेब्रुवारी २०२० रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळला गेला. आणि तेव्हापासून केदार अजूनही भारतीय संघात परतण्याची वाट पाहत आहे.


प्रथम फलंदाजी करताना,१५  जानेवारी रोजी इंग्लंड विरुद्ध 2017 पुणे एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ७ गडी गमावून ३६० धावा केल्या होत्या . या सामन्यात इंग्लंडच्या डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर भारतीय संघाने ६३ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. मात्र विराट आणि केदार जाधव यांनी तुफानी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यातील या खेळाडूंचे शतक संस्मरणीय ठरले. इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुल आणि शिखर धवन टीम इंडियासाठी सलामीला आले. यादरम्यान धवन अवघी एक धाव काढून बाद झाला.

केदार जाधवचे काम मधल्या फळीला बळकट करण्याचे होते, पण असे करताना तो सतत अपयशी ठरत होता. केदार जाधवने एकूण 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 73 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जाधवने दोन्ही फॉरमॅटमध्ये २० च्या सरासरीने ११२ धावा केल्या आहेत आणि ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत, जाधव यांना एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्यानंतर केदारच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. आणि तेव्हापासून केदार संघाबाहेर आहे, आणि आता संघात परतण्याचे स्वप्न पाहत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, केदारकडे निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण एवढ्या काळासाठी केदारला संघात न घेणे हेच सिद्ध होते की, आता त्याचे भारतीय संघात पुनरागमन अवघड नसून अशक्य आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप