आयपीएल च्या यंदाच्या मोसमात विराट कोहलीचा फॉर्म खराब राहिला आहे. अशा परिस्थितीत त्याच्या वर ही प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराट कोहली साठी या मोसमात परिस्थिती चांगली चाललेली नाही. विराट कोहली च्या या कामगिरी बाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. आरसीबीचा संघ प्लेऑफ मध्ये सामील झाला आहे.
View this post on Instagram
स्टार स्पोर्ट्स शो मध्ये बोलताना कोहली म्हणाला की मी या टप्प्या वर किंवा त्यापूर्वी जे काही अनुभवले आहे, मी एक गोष्ट प्रमाणित करू शकतो की मी एक व्यक्ती म्हणून स्वत:ला कधीही जास्त समजले नाही. मी आता अनुभवत आहे की जगाने तुमची एक मोठी ओळख निर्माण केली आहे, जी एक माणूस म्हणून तुमच्या वास्तविकतेपासून खूप वेगळी आणि दूर आहे.
कोहली पुढे म्हणाला की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या टप्प्यात आहे. मी मैदाना वर जे काही करतो त्यात मला स्वत:चे मूल्य सापडत नाही. माझ्या साठी हा चांगला टप्पा आहे. माझी ड्राइव कधीच संपणार नाही. ज्या दिवशी माझी ड्राइव निघून जाईल, मी हा खेळ खेळणार नाही.
View this post on Instagram
विशेष म्हणजे या मोसमात आरसीबी संघाला विराट कोहली च्या बॅटची फारशी साथ मिळाली नाही. काही प्रसंगी कोहली गोल्डन डक वर आऊट झाला आहे. कोहली ने या मोसमात १३ सामन्यात २३६ धावा केल्या आहेत. यादरम्यान कोहलीची सरासरी २० च्या आसपास आहे. आरसीबी ने या मोसमात १४ सामन्यांत ८ सामने जिंकले आहेत. आरसीबी ने सात सामन्यांत १६ गुण मिळवले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
इंडियन प्रीमियर लीग च्या २०२२ हंगामातील त्यांच्या शेवट च्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून पराभव केला होता. यासह दिल्लीचे हृदय तुटले होते, तर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस स्टारर टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळाला आहे. आरसीबीचे १६ गुण होते, तर दिल्लीचे १४ गुण होते. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयाची गरज होती, परंतु पाच वेळा चॅम्पियन मुंबईने त्यांना हा विजय मिळवून दिला नाही.