विराट कोहली पुन्हा होणार आरसीबीचा कर्णधार, डॅनियल व्हिटोरीने स्वतः दिली माहीती..!

आयपीएलचा पुढचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. आरसीबी संघाने अद्याप स्वत: साठी नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही. आरसीबी च्या नव्या कर्णधाराचे नाव जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मात्र संघाने अजून सस्पेन्स कायम ठेवला आहे. दुसरीकडे, या स्पर्धेचे वेळापत्रक आल्यापासून आरसीबी वर कर्णधार निवडण्याचा दबावही वाढला आहे.

याआधी विराटच्या हाती आरसीबीचे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र विराटने गेल्या वर्षीच आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. यामुळे संघाचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र, अनेक वेळा मोठ्या खेळाडूंनी असा अंदाज लावला आहे की, पुन्हा एकदा आरसीबी विराटकडे कर्णधारपद सोपवेल. पण या प्रकरणी डॅनियल व्हिटोरी काय म्हणाला ते जाणून घेऊया.

दुसरीकडे, माजी कर्णधार डॅनियल म्हणाला की, संघाला त्याच्या जागी दुस-याला नवीन कर्णधार बनवायला आवडेल. माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी पुढे म्हणाला, मला वाटते की तो विराट सोडून अजून पर्याय शोधत आहेत. संघ आता मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस किंवा दिनेश कार्तिकला संधी देऊ शकतात. मात्र पहिले तीन सामने जिंकल्यास ते शेवट पर्यंत त्यांच्या सोबत जाऊ शकतात. आयपीएल मध्ये ३ वर्षे कोणत्याही संघाचे कर्णधार म्हणून खेळणे हा खूप मोठा कालावधी आहे. मॅक्सवेल हा आरसीबी साठी ३ वर्षां साठी खेळणार आहे. आशा आहे की, तो गेल्या वर्षी प्रमाणेच खेळताना दिसेल.

आयपीएलच्या पुढच्या सीझनवर नजर टाकली तर हा सीझन या महिन्याच्या २६ तारखेपासून सुरू होणार आहे. यावेळच्या आयपीएलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण यंदा आयपीएल मध्ये दोन नवे संघही दाखल झाले आहेत. त्यामुळे आयपीएलचा हा मोसम खूपच रोमांचक असणार आहे. याशिवाय मेगा ऑक्शन मध्ये यावेळी सर्व संघांनी धोकादायक खेळाडूंचा समावेश केला आहे.

जर आपण आरसीबी बद्दल बोललो, तर यावेळी आरसीबी एका खेळाडू कडे कर्णधारपद सोपवेल जो आगामी काही वर्षे संघाचे कर्णधार पद सांभाळेल आणि ट्रॉफी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कारण आज पर्यंत च्या इतक्या वर्षांत विराटला आरसीबी साठी एक ही ट्रॉफी मिळवता आलेली नाही आणि यावेळी संघ आयपीएल चे विजेतेपद पटकावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. ज्यासाठी संघाला एका महान खेळाडूची गरज असेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप