KKR च्या पराभवानंतर चिडला सेहवाग, केली संघ व्यवस्थाबद्दल कठोर बदलाची गरज..!

इंडियन प्रीमियर लीग च्या गेल्या मोसमातील गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सची या मोसमात खराब कामगिरी सुरूच आहे. कोलकाता नाईट रायडर्स ने या मोसमातील पहिल्या ४ पैकी ३ सामने जिंकले होते, मात्र शेवटच्या ७ सामन्यां मध्ये त्यांनी एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स कडून केकेआरचा पराभव झाला. या सामन्यात केकेआरचा ७५ धावांनी पराभव झाला होता. यानंतर त्यांच्या संघ व्यवस्थापना वर, संघाच्या रणनीती वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यादरम्यान, भारताचा माजी सलामी वीर वीरेंद्र सेहवाग ने केकेआर मधील बदला बाबत सांगितले आहे. कोणी ना कोणी जबाबदारी घेऊन पुढे यायला हवे, तरच ते बरे होऊ शकते, असे सेहवाग ने स्पष्ट केले आहे. KKR-लखनौ सामन्या नंतर क्रिकबझ च्या पोस्ट मॅच शो दरम्यान, वीरेंद्र सेहवाग म्हणाला, कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आपण नेहमी आंद्रे रसेल वर अवलंबून राहू शकत नाही. त्यापेक्षा चांगले, तुम्ही त्याला ओपनिंग करायला पाठवा. जर तो गेला तर तो तुमच्या साठी १०-१२ षटकांत सामना पूर्ण करेल आणि तुमचे काम सोपे करेल.

View this post on Instagram

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

एरॉन फिंच आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट चा एवढा मोठा T-२० खेळाडू आहे, पण त्याच्या कडून अपेक्षित असे यश त्याला आयपीएल मध्ये मिळालेले नाही. राणा ने दोन सामन्यांत नक्कीच चांगल्या धावा केल्या आहेत, श्रेयस अय्यरनेही एक- दोन डावात धावा केल्या आहेत. पण तो सातत्यानं धावा करतोय असं दिसत नाही.

सेहवाग पुढे म्हणाला, जेव्हा श्रेयस अय्यर फलंदाजीला येतो गोलंदाज त्याला शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये तो रूम बनवण्याचा प्रयत्न करतो आणि खराब शॉट निवडी मुळे विकेट गमावतो. जबाबदारी ने फलंदाजी करणारा एकही फलंदाज दिसत नाही, मोठी धावसंख्या कोणीतरी एक टोक धरून ठेवली तरच होऊ शकते. त्यामुळे दुसऱ्या टोका पासून तुम्ही धावा काढण्या साठी जाता. त्यामुळे अशी कोणती ही जबाबदारी न घेतल्या ने हा संघ आपल्या चाहत्यांची निराशा करत आहे असे मला वाटते. कोलकात्याला काही बदल करावे लागतील. तुम्ही जुने खेळाडू रिलीज करा, नवे खेळाडू घ्या, संघ व्यवस्थापन बदलावे लागेल, तरच कोलकात्याला फायदा होईल, नाही तर समान व्यवस्थापन, समान खेळाडू, असेच निकाल मिळतील.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप