मुंबई इंडियन्सच्या पहिल्या ३ सामन्यात दारुण पराभवावर वीरेंद्र सेहवागने दिला खास सल्ला..!

इंडियन प्रीमियर लीग च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स ला १५ व्या हंगामातील सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स कडून मुंबई इंडियन्स चा दारुण पराभव झाला होता. जिथे कोलकाता ने पॅट कमिन्स च्या चांगल्या फलंदाजी च्या जोरावर ४ षटके बाकी असताना ५ विकेट्सनी कोलकाता संघा ने विजय मिळवला होता.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मैदाना वर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सची केकेआरने खूप धुलाई केली. जिथे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १६१ धावा केल्या होत्या, परंतु केकेआरने १६ षटकात ते पूर्ण केले. या मोसमात मुंबई इंडियन्स च्या सलग तिसऱ्या पराभवा मुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यातील पराभवा मुळे मुंबई इंडियन्स च्या अनेक चुका उघड झाल्या आहेत. त्यानंतर आता क्रिकेट तज्ञ त्यांना खास सल्ला देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

या मोसमातील पहिले दोन सामने गमावल्या नंतर मुंबई इंडियन्स ला या सामन्यात विजया ची मोठी सुवर्ण संधी मानली जात होती, कारण त्यांच्या समोर त्यांचा आवडता KKR संघ होता. आयपीएल मध्ये केकेआर विरुद्ध मुंबईचा चांगला रेकॉर्ड आहे. पण इथे केकेआर ने वेगळ्याच पद्धती ने मुंबई इंडियन्सला धूळ चारली. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने सल्ला दिला आहे. मुंबईने केकेआर कडूनच शिकण्याची गरज असल्याचे सेहवाग म्हणाला.

भारताचा माजी सलामी वीर वीरेंद्र सेहवाग ने क्रिकबझ च्या पोस्ट शो मध्ये म्हणाला आहे की, कर्णधार रोहित शर्माने त्याच्या संघाला सल्ला दिला तर कोणता सल्ला दिला पाहिजे. जा आणि बिंदास खेळा. जसे आपण कोलकात्या बद्दल बोलत होतो, की त्यांनी या पूर्वी मुंबई कडून बरेच सामने गमावले आहेत. पण जा आणि तुमचा खेळ खेळा, हरलो तर हराल, ही मानसिकता आता मुंबईला अपनावि लागेल. मुंबई इंडियन्स ला आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे. ५ सामने गमावल्या नंतर तुम्ही पात्र ठरलात यात शंका नाही ( सलग ५ सामने हरल्या नंतर २०१४ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ पात्र ठरला) पण रोजचा दिवस रविवार नसतो.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप