आम्ही पुढच्या सामन्यात सुधारणा करू.. सलग दुसऱ्या पराभवावर बोलला ऋषभ पंत..!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या T-२० मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियम वर खेळवला गेला होता, जिथे दक्षिण आफ्रिकेने ४ गडी राखून सामना जिंकला होता. यासह दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या दारूण पराभवा नंतर भारतीय कर्णधार ऋषभ पंत खूपच निराश दिसला होता. जाणून घेऊया सलग दुसऱ्या पराभवा वर तो काय म्हणाला.

दक्षिण आफ्रिके विरुद्ध च्या दारूण पराभवा वर भारतीय कर्णधार ऋषभ पंत ने सांगितले की, भारताने १०-१५ धावा कमी केल्या होत्या. भुवनेश्वर कुमार ने चांगली गोलंदाजी केली. मधल्या षटकां मध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. भुवी आणि वेगवान गोलंदाजांनी पहिल्या ७-८ षटका मध्ये चांगली गोलंदाजी केली पण दुसऱ्या टप्प्यात आम्ही आमच्या योजने नुसार गोलंदाजी केली नाही. दुसऱ्या हाफ मध्ये आम्हाला विकेट्सची गरज होती, पण ती आम्हाला मिळवता आली नाही. पण आम्ही आणखी सुधारणा करू आणि शेवटचे तीन सामने जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू.

भारतीय कर्णधार ऋषभ पंत पुढे म्हणाला की, आफ्रिकन संघा ने खरोखरच चांगली फलंदाजी केली आहे. आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो, आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही सुधारणा करू. आम्हाला आता उर्वरित तीन सामने जिंकायचे आहेत.

नाणे फेक हरल्या नंतर प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत च्या नेतृत्वा खालील भारतीय संघा ने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिके समोर विजया साठी १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिके च्या संघा ने हेनरिक क्लासेन च्या अर्धशतकी खेळी च्या जोरा वर १८.२ षटकांत ६ गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप