वेस्ट इंडिज मालिकेत कर्णधार रोहित शर्माचे करणार पुनरागमन, करणार हे मोठे बदल!

टीम इंडियाने आपल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाला अरभावाला सामोरे जावे लागले. भारताने याआधी कसोटी मालिका २-१ ने गमावली आणि त्यानंतर वनडे मालिकेत टीम इंडियाचा ३-० असा सफाया झाला.

भारताने शेवटची वनडे मालिका जुलै २०२१ मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळली होती. संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना, बीसीसीआयने तरुणांनी सजलेला भारत ब संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवला. वर्षभरानंतर हा भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत पूर्णपणे फॉर्मात नव्हता. चला तर मग भारताच्या पराभवामागील कारणांवर एक नजर टाकूया.

आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बातमीनुसार, या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होऊ शकते. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली वनडे मालिका खेळवली जाणार आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहितची ही पहिली वनडे मालिका असेल. यानंतर तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने  सांगितले की, “आम्हाला अद्याप एनसीएकडून रोहितचा फिटनेस अहवाल मिळालेला नसला तरी, आम्हाला माहित आहे की त्याने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे आणि तो संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. त्याचा कर्णधार संघासोबत असणे महत्त्वाचे आहे आणि त्याच्या उपस्थितीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढेल.”

वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तसेच जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील सर्व सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली.

अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या पूर्णपणे मॅच तंदुरुस्त नाहीत, त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळू शकत नाही. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले, त्यामुळे ते संघात त्यांचे स्थान कायम ठेवू शकतात.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल कडून खूप आशा होत्या परंतु या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांचा सुद्धा विचार करण्याची शक्यता आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप