लता मंगेशकर यांची अखेरची इच्छा काय होती…! जाणून व्हाल भावुक!!

मंगेशकर घराण्यात जन्मलेली एक मुलगी भविष्यात इतकं मोठं नाव कमवेल, याची साधी कल्पनाही कोणी कधी केली नव्हती. पण तिचे हे स्वप्न साकार झाले आणि तिच्या दैवी आवाजानं संपूर्ण जगाला जणू मंत्रमुग्ध करून टाकले. त्या सुरांच्या राणीच नाव म्हणजे लता मंगेशकर! वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी वडिलांचं निधन झाल्याने आई, ३ छोट्या बहिणी व सर्वात धाकटा एक भाऊ अशा सर्वांची जबाबदारी लता यांच्या खांद्यावर येऊन विसावली. या सगळ्यांची जबाबदारी घेत लता दीदींनी त्यांचे हे कर्तव्य अगदी शेवटपर्यंत निभावले.

उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांनी गाणी गायला सुरूवात केली. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. पण लता दीदी आयुष्यातल्या अनेक अवघड प्रसंगांना हिमतीने तोंड देत त्याला धीरानं सामोऱ्या गेल्या. पण हे सर्व करताना कधीही त्यांनी कुणाचंही वाईट चिंतलं नाही वा कधी कोणासाठी मनात वाईट विचार आणले!

त्यांच्या इतक्या चांगुलपणाचा फायदा घेत अगदी त्यांच्यावर विषप्रयोग देखील करण्यात आला होता. स्वत: लतादीदींनी एका मुलाखती दरम्यान या घटनेचा उल्लेख केला होता. याच कारणामुळे लता दीदी तब्बल तीन महिने अंथरूणाला खिळून होत्या.

प्रकृती स्थिरावल्या नंतर हा विषप्रयोग कुणी केला, याच उत्तर लता दीदींना मिळालं होतं. पण तरीही त्यांनी त्या व्यक्तीच्या विरोधात कसलीही कारवाई केली नाही. अर्थात त्या व्यक्तिविरोधात त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध ही नव्हता. पुढे जाऊन या व्यक्तिलाही लता दीदींनी माफ करून टाकलं.

याचदरम्यान आता लता दीदींच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो म्हणजे एका जुन्या मुलाखतीच्या दरम्यान काढलेल्या या व्हिडीओत लता दीदी स्वत:बद्दल बोलताना दिसत आहेत. ‘लोकांनी मला कायम कधीही कुणाचंही वाईट न चिंतणारी व्यक्ति म्हणून आठवणीत ठेवावं!’ अशी इच्छा त्यांनी या व्हिडीओ मार्फत व्यक्त केली आहे.

यावेळी लता दीदी म्हणाल्या की,
‘माझी अशी इच्छा आहे की, लोकांनी मला कुणाचंही वाईट न चिंतणारी व्यक्ति म्हणून कायम आठवणीत ठेवावं. मी कधीही कुणाचं वाईट चिंतलं नाही, कुणाचं कधी वाईट केलं नाही. मी आपल्या गीतांद्वारे देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी किती सेवा केली, हे मला माहित नाही. कारण मी चित्रपटांची गाणी गाते. पण यापेक्षा वेगळं काही सांगू इच्छित नाही. मात्र मनात इच्छा खूप आहेत.’ अशा भावना व्यक्त करताना लता दीदी या व्हिडीओत दिसल्या आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप