जेव्हा गोविंदाचा ‘आ गया हीरो’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्या वेळी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक गोविंदा होते पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास पराक्रम करू शकला नाही. गोविंदाने खूप काळानंतर बोलीवूडमध्ये कमबॅक केले होते पण तरीही हा चित्रपट काही खास कामगिरी करू शकला न्हवता. त्या वेळी आजून एक अशी गोष्ट घडली होती कि त्यामुळे गोविंदा चे लग्न मोडता मोडता वाचले होते. चला तर मग जाऊन घेऊ असं नेमक काय झालं होत.
View this post on Instagram
गोविंदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माध्यमांसमोर बोलत नाही. पण एक काळ असा होता की त्याच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. बॉलीवूडमध्ये धडपड सुरू असताना गोविंदाचे लग्न झाले होते. पण लग्नानंतरच त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आणि तो सुपरस्टार बनला. जरी आता गोविंदा आपल्या बायकोवर खूप प्रेम करत असला तरी, एक काळ असा होता की त्याचे हृदय राणी मुखर्जीवर पडले होते. रिपोर्ट्सनुसार, या दोघांच्या अ फेअरचे किस्से इतके चर्चेत आले कि त्याचे लग्न संबंध तुटण्याच्या मार्गावर होते.
राणी आणि गोविंदा यांची भेट ‘हद कर दी आप ने’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. गोविंदाच्या अभिनयाने राणी मुखर्जींना भुरळ पडली होती, अर्थातच गोविंदा चा अभिनय होता च तसा कि कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. गोविंदा सेटवर सर्वांना हसवायचा. यामुळे राणी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आणि, हि त्यांची पहिली भेट होती त्या पहिल्या भेटीतच राणी गोविंदाच्या प्रेमात पडली.
या चित्रपटादरम्यान दोघांनीही अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये शूट केले होते. यामुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. यानंतर हे दोघेही बर्याचदा एकत्र दिसले. इतकेच नव्हे तर गोविंदाने अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर राणीच्या नावाची शिफारस करण्यास सुरवात केली. हळूहळू त्यांच्या अ फेअरची बातमी गोविंदाची पत्नी सुनीता पर्यंतही पोहोचली. वृत्तानुसार गोविंदा काही काळ घर सोडून राणी सोबत राहण्यासाठी गेला होता.
राणीच्या आई-वडिलांनाही त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती पण त्यांनी हे नाते स्वीकारण्यास नकार दिला. इतकेच नाही तर गोविंदा राणी ला खुप साऱ्या महागड्या गिफ्ट सुद्धा देत होता जेव्हा, हे सर्व गोविंदाच्या पत्नीला समजले आणि तिने गोविंदाला सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचे डोळे उघडले. गोविंदाला आपले वैवाहिक संबंध संपवायचे नव्हते, म्हणून त्याने राणीशी असलेले संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. राणी बरोबर चे समंध संपवून गोविंदाने त्याची बायको सुनीता समोर आपली चूक मान्य केली आता गोविंदा आपल्या पत्नीबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.