लग्न कधी करणार ? या प्रश्नाचे उत्तर देताना पहा काय म्हणाली ‘दबंग गर्ल सोनाक्षी ‘ जाणून धक्काच बसेल..!

बॉलिवूड मध्ये ‘दबंग’ या ब्लॉकबस्टर सिनेमा मधून यशस्वी पदार्पण करणारी दबंग गर्ल म्हणजे सोनाक्षी सिन्हा! शत्रुघ्न सिन्हाची लाडकी लेक असलेली सोनाक्षी लुटेरा, तेवर, रावडी राठोड या दमदार चित्रपटातून झळकली आहे. तिच्या निखळ हास्याची जादू तिच्या फॅन्सवर कायमच पसरलेली दिसते. सध्या सगळीकडे लग्नसराईचा सिझन सुरु आहे. चित्रपट सृष्टीतील हिरो हिरोईन लग्न बंधनात आडकताना दिसत आहेत . सोनाक्षीला देखील लग्न कधी करणार ?असे विचारले असता त्यावर तिने अशी दिली आहे प्रतिक्रिया!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या बोल्ड आणि हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तिला विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे ती तिच्या वेगळ्या स्टाईलने अगदी बिनदास्तपणे देत असते. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हाने आपल्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ हा प्रश्न उत्तरांचा अनोखा सेशन ठेवला होता. यादरम्यान चाहत्यांनी अभिनेत्रीला पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक हटके प्रश्न विचारले. सोनाक्षी सिन्हानेसुद्धा सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्या चुलबुल्या अंदाजात दिली आहेत. सेशन झाल्यानंतर सोनाक्षीने आपल्या इन्स्टाच्या स्टोरीमध्ये या प्रश्न उत्तरांचे स्क्रीन शॉट्स शेअर केलेले .

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

या वेळी एका फॅनने सोनाक्षीला विचारलं की , ‘या विकेंडला तुम्ही काय केल?’ यावर उत्तर देत सोनाक्षीने म्हटलं आहे, ‘मी या आठवड्यात या सोफ्यावर पडून क्रोनॉकल क्रमात मार्वल चित्रपट पुन्हा पहिला ‘. तर दुसऱ्या फॅनने प्रश्न करत तिला विचारलं होतं. ‘या क्षणी तू काय करत आहेस?’ यावर उत्तर देत सोनाक्षी म्हणाली, ‘सध्या मी टीव्हीसमोर आहे मी आता पाचवा चित्रपट पाहात आहे . यावेळी टीव्ही सेटचा एक व्हिडीओसुद्धा तिने शेअर केलेला ‘.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अनेक फोटो आणि नवनवीन व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. याच सेशन दरम्यान एका चाहत्याने सोनाक्षीला तिच्या लग्नाबद्दलसुद्धा प्रश्न विचारून टाकला. त्याने असा प्रश्न विचारला की , ‘मॅडम सर्वांची लग्न होत आहेत. तुम्ही कधी लग्न करणार?’ यावर उत्तर देत सोनाक्षीने आपला एक हसणारा बुमरँग शेअर केला आहे. सोबतच तिने त्यात लिहिले की , ‘सध्या सर्वांनाच कोरोना होत आहे. मलासुद्धा कोरोना व्हायला हवा का?” या प्रश्नाला मजेशीर उत्तर देत तिने सर्वांची मने पुन्हा एकदा जिंकली .

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सर्व जण सोनाक्षी सिन्हाला नेहमीच पाहतात . ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बिनधास्त आणि अतिशय योग्य रीतीने देत असते. त्यामुळे अनेकांना कधी कधी ती उद्धटही वाटते. यावेळी एका चाहत्याने प्रश्न विचारत तिला तिच्या या रुड स्वभावाबद्दल विचारलं होतं. यावर उत्तर देत सोनाक्षी म्हणाली ‘नाही मी खरोखरच अशी नाहीय. हा माझ्या सेन्स चा भाग आहे. माझा सेन्स ऑफ ह्युमर दाखवण्यासाठी मी असा अंदाज वापरते. पण मी अजिबात अशी नाहीय. परंतु फारच कमी लोकांना हे प्राप्त असतं.. मी त्यापैकी एक आहे. असे ती म्हणाली .

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप