आशिया चषक यंदा २७ ऑगस्ट पासून यूएईमध्ये होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या स्पर्धेची ही १५ वी आवृत्ती असेल. युएईमध्ये आशिया चषकाचा टी-२० फॉर्मेट दुसऱ्यांदा होणार आहे. ही स्पर्धा यापूर्वी श्रीलंकेत होणार होती, परंतु देशातील आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आशियाई देशांदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत एकूण सहा संघ आपली दावेदारी सादर करणार आहेत. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेचा अंतिम सामना १ सप्टेंबर रोजी दुबई येथे होणार असल्याची माहिती आहे. या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता म्हणून आपले आव्हान सादर करेल. अशा परिस्थितीत आपण २०१८ च्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची सद्यस्थिती जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा (कर्णधार)
२०१८ आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचा स्थायी कर्णधार होता. रोहितने पाच सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या सहाय्याने ३१७ धावा केल्या होत्या. रोहितने आता पर्यंत १६ वनडे, ३४ टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. सध्या तो तिन्ही फॉरमॅट मध्ये भारतचा कर्णधार आहे.
View this post on Instagram
शिखर धवन
२०१८ च्या आशिया कप मध्ये शिखर धवन आणि रोहित शर्माने भारता साठी सलामीच्या जोडीची भूमिका बजावली होती. धवनने पाच सामन्यांमध्ये दोन शतके आणि ६८.४० च्या सरासरीने ३४२ धावा करून स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. सध्या धवन भारताच्या T२० संघातून बाहेर आहे. पण त्याने भारताच्या एकदिवसीय संघात आपली उपस्थिती कायम आहे.
केएल राहुल
केएल राहुलने २०१८ च्या आशिया कप मध्ये फक्त एकच सामना खेळला आणि ६६ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या. तो सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे आणि कसोटी आणि T२० मध्ये रोहित शर्माचा सलामीचा भागीदार आहे.
मनीष पांडे
मनीष पांडे हा एकेकाळी ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. २०१८ च्या आशिया कपमध्ये त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध ८ धावा केल्या होत्या. स्पर्धेनंतर तो जानेवारी २०२० पर्यंत संघाबाहेर होता. त्याने अखेरचा एकदिवसीय सामना जुलै २०२१ मध्ये खेळला होता. त्याने २०२१-२२ रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचे नेतृत्व केले आणि त्यांना उपांत्यपूर्व फेरीत नेले होते.
अंबाती रायुडू
अंबाती रायडूने २०१८ आशिया चषक स्पर्धेत दोन अर्धशतकांसह ४३.७५ च्या सरासरीने सहा सामन्यात १७५ धावा केल्या होत्या. २०१९ मध्ये त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रायुडू शेवटचा IPL २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला होता.
केदार जाधव
केदार जाधव २०१८ च्या आशिया कपमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. त्याने तीन डावात ७० धावा केल्या आणि सहा विकेट्सही घेतल्या. २०२१ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो शेवटचा खेळताना दिसला होता.
एमएस धोनी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने २०१८आशिया कपमध्ये सहा सामने खेळले. अंतिम सामन्यात त्याने ३६ धावांचे योगदान दिले. या स्पर्धेत त्याने एकूण ७७ धावा केल्या. २०१९ च्या विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली होती. तो सध्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे.
रवींद्र जडेजा
२०१८ च्या आशिया चषकात जडेजा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याने चार सामन्यांत सात विकेट घेतल्या. जडेजा सध्या भारतीय संघाकडून प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळत असून आगामी आशिया चषक स्पर्धेत तो पुन्हा एकदा महत्त्वाचा खेळाडू असेल.
भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमारने २०१८ आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी ४.१९ च्या इकॉनॉमी रेटने पाच सामन्यांत सहा विकेट घेतल्या. तो सध्या पॉवरप्लेमधील सर्वोत्तम पांढऱ्या चेंडू गोलंदाजांपैकी एक आहे.
कुलदीप यादव
डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव २०१८ आशिया चषक स्पर्धेत रशीद खान आणि मुस्तफिजुर रहमानसह संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने सहा सामन्यांत २३.७० च्या सरासरीने आणि ३४.८ च्या स्ट्राईक रेटने १० विकेट घेतल्या. या स्पर्धेत तो पुन्हा एकदा संघाचा भाग असेल.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो सर्व प्रमुख स्पर्धांसाठी भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. बुमराह बांगलादेशमध्ये २०१६ च्या आशिया चषकाचा देखील भाग होता. आशिया चषक २०१८ मध्ये, त्याने चार सामन्यांमध्ये १६ च्या सरासरीने आणि ३.६७ च्या इकॉनॉमी रेटने आठ विकेट्स घेतल्या. आगामी आशिया चषक स्पर्धेतही तो संघासाठी महत्त्वाचे योगदान देईल.