आयपीएल चालू असताना या दिग्गज क्रिकेटपटूने अचानक घेतली निवृत्ती, क्रिकेट प्रेमी झाले निराश..!

आयपीएल २०२२ ची लढाई सुरूच आहे. यादरम्यान न्यूझीलंडच्या या दिग्गज खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. इंडियन प्रीमियर लीग च्या १५ व्या हंगामा दरम्यान, न्यूझीलंड चा महान खेळाडू रॉस टेलर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रॉस टेलरने सोमवारी नेदरलँड्स विरुद्ध च्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड कडून शेवटचा सामना खेळला आहे, ज्या मध्ये त्याने १४ धावा केल्या आणि प्रेक्षकांनी उभे राहून या महान खेळाडूला अभिवादन केले होते.

हा टेलरचा न्यूझीलंड साठी चा ४५० वा शेवटचा सामना होता, ज्याने त्याच्या १६ वर्षां च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी चा शेवट ही केला आहे. ३८ वर्षीय फलंदाजा ने या वर्षा च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिके विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता, परंतु त्याला त्याच्या घरच्या मैदाना वर, सेडन पार्क वर शेवटचा सामना खेळून क्रिकेटला अलविदा करायचे होते. राष्ट्रगीता च्या वेळी रॉस टेलर ची मुले मॅकेन्झी, जॉन्टी आणि अॅडलेड त्याच्या सोबत उभे होते. जेव्हा तो मैदानात उतरला आणि परतला तेव्हा नेदरलँड च्या खेळाडूंनी त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्याचा आदर केला.

View this post on Instagram

A post shared by Ross Taylor (@rossltaylor3)

टेलर ने २००६ मध्ये न्यूझीलंड कडून पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. पुढच्या वर्षी तो पहिला कसोटी खेळला. त्याने ११२ कसोटी सामन्या मध्ये १९ शतकांच्या मदतीने ७६८३ धावा केल्या आहेत. टेलर ने २३६ एकदिवसीय सामन्या मध्ये ८५९३ धावा आणि १०२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये १९०९ धावा केल्या आहेत.

तीनही फॉरमॅट मध्ये १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. शेवट च्या सामन्यात त्याला क्रीज वर येण्या साठी बराच वेळ वाट पाहावी लागली होती. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांनी दुसऱ्या विकेट साठी केलेल्या २०३ धावांच्या भागीदारी मुळे त्याला ३९ व्या षटकात क्रीज वर पोहोचता आले. तो मैदाना वर येताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. १४ धावांवर बाद झाल्या वर पॅव्हेलियन मध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. तो नेदरलँड च्या खेळाडूं मधून बाहेर पडला आणि मैदाना बाहेर गेला. या यादरम्यान उपस्थितांनी उभे राहून त्याचे स्वागत केले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप