पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची लहान बहीण साकारणारी निरी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

सध्या टीव्ही वर नवनवीन विषयांवर आधारित येत असणाऱ्या मालिकांचे पेव फुटले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो ही नवी मालिका पप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ही मालिका नीम की मुखीया या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे समजते. मालिकेतून नखरेल पिंकीची भूमिका साकारणाऱ्या पिंकीची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यात तिला बंटी, निरी आणि दिप्या या तिघांचीही चांगली साथ मिळताना दिसत आहे. पिंकीच्या गावात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यात सरपंच पदासाठी महिलांना राखीव उमेदवारी देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Saisha Salvi (@saisha_salvi)

यात सरपंच पदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या धोंडे पाटील घराण्याला मात्र चांगलीच खीळ बसली आहे. आता यात महिला उमेदवार म्हणून पिंकीच निवडणूक लढवणार का हे येत्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वेगळे कथानक असलेल्या या मालिकेत पिंकीला प्रत्येक गोष्टीत वेळोवेळी साथ देणारी तिची धाकटी बहीण म्हणजेच निरी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान पटकवताना दिसत आहे.

सोज्वळ आणि तितकीच समजुतदार असलेल्या निरीचे पात्र मालिकेत विशेष भाव खाऊन जाताना दिसते. यात ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री सारिका साळुंके हिने. सारिका ही मूळची सातारा गावातली, इथेच तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सारिका सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक विनोदी व्हिडीओ पाहायला मिळतात अशाच माध्यमातून सारिकाला मालिके

मध्ये चमकण्याची संधी मिळाली. वाडीवरची स्टोरी या सिरीज अंतर्गत वेगवेगळे विनोदी व्हिडीओ प्रदर्शित करण्यात येतात, त्यात सारिका तिच्या फॅन्सना मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. राहुल वाघमारे लिखित आणि दिग्दर्शित, पक्के सातारी या वेबसिरीजमध्ये देखील सारिका एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकताना पहायला मिळाली. महत्वाचं म्हणजे धर्मेंद्र यादव दिग्दर्शित शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या खूपच चर्चेत राहिली.

View this post on Instagram

A post shared by Saisha Salvi (@saisha_salvi)

या वेबसिरीजने जवळपास ११ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणले. यातले सगळेच भाग लोकप्रिय ठरले. त्यातील काजलचे पात्र खूपच प्रसिद्ध झालेले. सारिकाला हे पात्र साकारण्याची नामी संधी मिळाली. आणि तिने संधीचे सोने केले!इथूनच तिला खरी ओळख मिळाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पिंकीचा विजय असो या मालिकेतून ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर चमकताना दिसत आहे. या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाई या पुण्यभू नगरीत केले जात आहे. त्यामुळे मालिकेने स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी देखील मिळवून दिली आहे.

पदार्पणातील पहिल्या वहिल्या सुपरहिट मालिकेमुळे सारिकासाठी ही मालिका सुवर्णसंधी ठरली आहे. पिंकी, निरी आणि दिप्या हे तिघेही अतरंगी भावंडं प्रेक्षकांचे मनोरंजन करून घराघरात पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. नीरीच्या या दमदार भूमिकेसाठी आणि तिच्या आगामी यशस्वी वाटचालीसाठी सारिका साळुंके हिला खूप खूप शुभेच्छा.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप