विराट आणि बाबर मध्ये कोण आहे सर्वश्रेष्ठ? या पाकिस्तानी गोलंदाजाने दिले उत्तर..!

विराट कोहली आणि बाबर आझम हे दोघेही क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजां मध्ये गणले जातात. विराट कोहलीला गेल्या तीन वर्षां पासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तर बाबर आझम ने आपल्या फलंदाजी ने सर्वांची मने जिंकली आहेत. या दोन क्रिकेटपटूं मध्ये सर्वोत्तम कोण यावर चाहत्यां मध्ये नेहमीच युद्ध सुरू असते. या मुद्द्यावर क्रिकेट च्या दिग्गजांचेही स्वतःचे मत आहे. पण जेव्हा हा प्रश्न पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला विचारण्यात आला तेव्हा त्याने या प्रश्नाचे उत्तर बिन्दास्तपणे दिले.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने अलीकडेच एका सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलवर रॅपिड फायर राउंडमध्ये विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या प्रश्नाला अगदी सहज उत्तर दिले आहे. खरं तर, जेव्हा त्याला विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या पैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले तेव्हा त्याने अतिशय साधेपणाने उत्तर दिले आणि म्हणाला- मला दोघेही आवडतात.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

हा एकमेव प्रश्न न्हवता ज्यावर शाहीन आफ्रिदीला कोणतेही एक नाव निवडणे योग्य वाटले नाही. यापूर्वी, त्याला केन विल्यमसन आणि जो रूट यापैकी एकाची निवड करायची होती, परंतु त्याने या दोन्ही खेळाडूंना आपले आवडते म्हणून सांगितले होते.

पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला रॅपिड फायर राऊंड मध्ये इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांच्या पैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आले होते, तेव्हा त्याने कोणताही संकोच न करता त्याचा सहकारी मोहम्मद रिझवानची निवड केली होती.

View this post on Instagram

A post shared by Babar Azam (@babarazam)

आईसीसी २०२१ T-२० वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान ने चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. उपांत्य फेरी च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने सामन्या च्या शेवट च्या क्षणी सलग षटकारांचा पाऊस पाडत पाकिस्तानला नमवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T-२० विश्वचषकात पाकिस्तानला या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. अशा परिस्थितीत २०२२ च्या विश्वचषका साठी पाकिस्तान च्या नजरा ऑस्ट्रेलियन संघा वर आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप