मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीतील सर्वात कमजोर कडी आहे कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या काय सांगतात आकडे..!

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल मध्ये उशीरा सुरुवात करण्या साठी ओळखला जातो. मुंबई चा संघ सुरुवातीला सामना हरतो आणि नंतर शानदार पुनरागमन करतो. मात्र यावेळी मुंबईकरांना ते करणे फार कठीण जाणार आहे. संघाचा सर्वात मजबूत खेळाडू आता संघाचा सर्वात कमकुवत खेळाडू बनला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा साठी हा सीझन खास राहिला नाही. तो सतत फ्लॉप होत आहे. त्याने आयपीएल मध्ये आता पर्यंत ४१ धावा केल्या आहेत. त्याच्या बॅट मधून मोठी खेळी होत नसल्याने मुंबईच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय गेल्या मोसमात ही त्याने १३ सामन्यात केवळ ३८१ धावा केल्या होत्या. ज्या रोहित सारख्या मोठ्या खेळाडू साठी फारच कमी आहेत. त्याच्या फलंदाजी चांगली होत नसल्या मुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत मुंबईला विजय मिळवायचा असेल तर रोहित ला एक नाही तर अनेक मोठ्या खेळी खेळाव्या लागतील.

View this post on Instagram

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

या वेळी मुंबई इंडियन्स ला पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादव ची कमतरता भासली होती. सूर्यकुमार दुखापती मुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थिती मुळे मुंबई इंडियन्स ची मधली फळी खूपच कमकुवत दिसली होती. त्याच्या जागी संघाने अनमोल प्रीतला पहिल्या दोन सामन्यात खेळण्या ची संधी दिली होती पण त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही.

मुंबईकडे सध्या मधल्या फळीत अनुभवी फलंदाज नाहीत. अनमोल प्रीत ने २ सामन्यात केवळ २७ धावा केल्या आहेत. याशिवाय टीम डेव्हिड ने ही पूर्ण पणे निराश केले आहे. दोन सामन्यांत त्याने केवळ १३ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत अनुभवा अभावी मुंबईला ही पराभवाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वी मुंबई कडे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या सारखे खेळाडू होते, ज्यांनी केवळ जलद धावा केल्या नाहीत तर स्वबळावर सामनाही जिंकवत होते. मात्र या वेळी मुंबई ने दोघांना संघात सामील केले नाही. ते दोघेजण आता वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. केवळ इशान किशन आणि टिळक वर्मा यांनी संघा साठी चमकदार कामगिरी केली आहे. इशानने सलग दोन अर्धशतके केली आहेत. याशिवाय टिळकने गेल्या सामन्यात ही शानदार अर्धशतक झळकावले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप