यंदाच्या आयपीएल मधील केकेआर संघाचा खतरनाक अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून तरुणी च्या फोटोवर कमेंट केली होती, ज्या नंतर चाहत्यांचे लक्ष त्या कमेंट वर वेधले होते. हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे की, व्यंकटेश अय्यर या २९ वर्षीय मुलीला म्हणजेच प्रियंका जवळकरला डेट करत आहे का? नुकताच प्रियांका ने तिच्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला, ज्यावर व्यंकटेश अय्यरने कमेंट करत लिहिले, क्यूट.
दुसरीकडे प्रियांकाने व्यंकटेश च्या या कमेंटला उत्तर देताना लिहिले की, तू कोण आहेस? मात्र आता व्यंकटेश आणि प्रियांका यांच्यातील मेसेज नंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. काही यूजर्सने या दोघांच्या नात्या बद्दल बोलायला सुरुवात केली असतानाच इतर यूजर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली होती.
View this post on Instagram
प्रियांकाबद्दल बोलायचे झाले तर, अनंतपूरच्या मराठी कुटुंबात जन्मलेली प्रियांका जावळकर असे पूर्ण नाव आहे. इतकंच नाही तर प्रियांका ही तेलुगू चित्रपटांतील खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. याशिवाय तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून शिक्षण घेतले आहे. तिने २०१७ मध्ये, रिक्षावाला या तेलगू चित्रपटात पदार्पण करताना दिसली होती, जिथे तिच्या सोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील प्रियांकाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय प्रियांकाने २०२१ मध्ये गमनम या चित्रपटातही काम केले आहे.
View this post on Instagram
प्रियांका सोशल मीडिया वर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्राम वर तिचे १ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जर आपण व्यंकटेश अय्यर बद्दल बोललो तर कोलकाता नाईट रायडर्स चा सलामीवीर व्यंकटेश अय्यर ने गेल्या मोसमात खूप नाव कमावले होते. अय्यरला आयपीएल च्या १४ व्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अय्यर ने सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली होती. अय्यरने गेल्या आयपीएल हंगामात १० सामने खेळले होते, ४१.११ च्या सरासरीने ३७० धावा केल्या होत्या, त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या मोसमा साठी केकेआरने या युवा अष्टपैलू खेळाडूला ८ कोटी रुपया मध्ये कायम ठेवले होते.