पंजाब किंग्ज इंडियन प्रीमियर लीग (IPL २०२२) प्लेऑफ मध्ये पोहोचन्याचा सस्पेन्स कायम आहे. पंजाब किंग्जला शनिवारी राजस्थान रॉयल्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यादरम्यान पंजाब किंग्स नेहमीच चर्चेत राहिला आहे. विशेषत: पंजाब किंग्ज च्या प्रत्येक सामन्यात मैदानात दिसणारी मिस्ट्री गर्ल.
पंजाब किंग्सची ही मिस्ट्री गर्ल म्हणजे शशी धीमान, जी टीम च्या सोशल मीडिया पेज साठी अँकरिंगचं काम करत आहे. पंजाब किंग्स ने आयपीएल २०२२ सीझन मध्ये अनेक YouTube व्हिडिओ, इंस्टाग्राम व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रिलीज केले आहेत, ज्या मध्ये शशी धीमान देखील आहे.
View this post on Instagram
शशी धीमन ने आता पर्यंत शिखर धवन, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्याचे सोशल मीडिया वर पडसाद उमटत आहेत. याशिवाय पंजाब किंग्ज संघाचे सामन्या पूर्वी चे आणि नंतरचे व्हिडिओ देखील ट्रेंडिंग मध्ये आहेत. जर आपण शशी धीमन बद्दल बोललो तर ती स्टँड-अप कॉमेडियन आहे. ती गेल्या तीन- चार वर्षां पासून स्टँड- अप कॉमेडी करत आहे, तिचे अनेक व्हिडिओही लोकप्रिय झाले आहेत.
View this post on Instagram
चंदिगड मध्ये राहणारी शशी धीमान पंजाबी आहे, त्यामुळे ती खेळाडूंशी पंजाबी मध्ये बोलत आहे आणि पंजाबी मध्ये अनेक व्हिडिओ शूट करत आहे. अशा परिस्थितीत पंजाब किंग्ज च्या चाहत्यांशी संघाचे नाते जोडले जात आहे. शशी धीमान २०२० पासून मुंबईत राहत होती, ती अनेक स्टँड शो, कॉमेडी शो आणि लाइव्ह शो करत आहे. याच वर्षी, ती आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जशी जोडली गेली आहे.
View this post on Instagram
जर आपण तिच्या अभ्यासा बद्दल बोललो तर शशी धीमान एक फार्मा शास्त्रज्ञ आहे, परंतु वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केल्या नंतर ती स्टँड- अप कॉमेडी कडे वळली आहे. पंजाब किंग्ज च्या प्रत्येक सामन्यात शशी धीमन मैदाना वर दिसते आणि खेळाडूं सोबत बस मध्ये प्रवास करत असते, जिथे ती खेळाडूंशी बोलते आणि खेळाडूंच्या मुलाखती घेते.