कोण होता महान बॉक्सर मुहम्मद अली? त्याचे नाव ऐकताच थरथर कापायचे खेळाडू..!

मुहम्मद अली हा जगातील सर्वात प्रसिद्ध बॉक्सर मानला जातो. त्याचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला होता. तो ३ वेळा हेवी वेट चॅम्पियन ही राहिला आहे. याशिवाय तीन वेळा लेनिएल चॅम्पियनशिप जिंकणारा तो एकमेव बॉक्सर आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने एकूण ६१ लढती लढल्या होत्या, त्यापैकी ५६ लढती जिंकल्या आणि केवळ ५ सामन्या मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१६ मध्ये या दिवशी त्याचे निधन झाले होते. अशा परिस्थितीत त्याच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही संस्मरणीय किस्से.

मुहम्मद अली लहानपणा पासूनच इतर मुला पेक्षा वेगळा होता. इतर मुलांप्रमाणे तो बसने शाळेत जात नसे, त्याऐवजी तो स्कूल बसशी रेस लावून शाळा गाठायचा. त्यामुळे त्याचे शरीर बालपणा पासून अधिक कडक झाले होते. याचा फायदा त्याच्या कारकिर्दीतच झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगभरातील बॉक्सर्सना पराभूत करणारा मोहम्मद अली फ्लाइट मध्ये बसण्यास घाबरत होता. त्याला याची इतकी भीती वाटली की १९६० च्या ऑलिम्पिक मध्ये रोमला जाण्या साठी जेव्हा तो विमानात बसला तेव्हा त्याने एअर होस्टेसला पॅराशूट घालण्यास सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Muhammad Ali (@muhammadali)

मोहम्मदी अलीचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली होते. इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनही त्याचे ऐकत होता. १९९० च्या दशकात, जेव्हा त्याने इराक वर हल्ला केला आणि २००० हून अधिक परदेशी नागरिकांना बंधक बनवले होते. त्यावेळी मुहम्मद अलीने सद्दाम हुसेनशी संवाद साधला होता. त्यासाठी तो बगदादला गेला होता. दोघांमध्ये ५० मिनिटांच्या चर्चेनंतर सद्दामने १५ अमेरिकन नागरिकांची सुटका केली होती.

याशिवाय १९६७ मध्ये अमेरिका आणि व्हिएतनाम युद्धासाठी त्याने सैन्याचा भाग होण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याचे सर्व विश्वविजेतेपद काढून घेण्यात आले होते आणि त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १९७१ मध्ये त्याच्या अपीलवर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याच्या वरील बंदी हटवली होती. त्याचे खरे नाव कॅसियस मार्सेलस क्ले होते. पण ६ मार्च १९६४ रोजी अमेरिकन मुस्लिम धार्मिक संघटना ‘नेशन ऑफ इस्लाम’ आणि त्यांचा नेता माल्कम एक्स याला प्रभावित होऊन त्याने इस्लाम स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप