कोण होणार RCB संघाचा कर्णधार? आरसीबीचे संचालक माईक हेसन याने केली घोषणा..!

जगातील स्टार फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने IPL २०२१ नंतर RCB संघाचे कर्णधारपद सोडले होते. तेव्हापासून आरसीबी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आरसीबी संघाने अनेक दिग्गज खेळाडूंना संघात सामील केले आहे.

आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हेसन याने म्हटले आहे की RCB आयपीएल मेगा लिलावानंतर नवीन कर्णधाराचा निर्णय घेईल. शनिवारी लिलावाच्या पहिल्या दिवशी, बेंगळुरूने फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, अनुज रावत आणि आकाश दीप यांना आणि गेल्या वर्षीच्या हर्षल पटेल व वानिंदू हसरंगा या खेळाडूंना संघात सामील केले आहे. हेसन याने पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही अद्याप यावर चर्चा केलेली नाही. आमच्या संघात आमच्याकडे तीन अविश्वसनीय खेळाडू आहेत- मॅक्सवेल, विराट आणि फाफ, आम्ही त्या तीन खेळाडूसह खरोखर आनंदी आहोत. याशिवाय, आम्ही लिलावानंतर कर्णधारपदाचा निर्णय घेऊ, परंतु फाफ डू प्लेसिस हा आरसीबीचा कर्णधार असेल, अशी बातमी येत आहे.

माईक हेसनने २०२१ च्या सिजन मध्ये सर्वाधिक ३२ विकेट घेणारा हर्षल पटेलला परत खरेदी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला, त्याला परत खरेदी केल्याने आम्हाला खरोखर आनंद झाला आहे. कार्तिक मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतो. आरसीबीने श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा याला मोठ्या किमतीत करारबद्ध केले आहे. हेसनने युझवेंद्र चहलच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा लेग-स्पिन अष्टपैलू हसरंगाच्या कौशल्या बद्दल सांगितले, त्याला राजस्थान रॉयल्सने संघातून बाहेर केले होते. तो संघात संतुलन निर्माण करतो व त्याच्याकडे पाच ते आठ दरम्यान कुठेही फलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो गोलंदाजीही करू शकतो आणि मिडल ऑर्डरही सांभाळू शकतो. त्याच्याकडे ही काही खास कौशल्ले आहेत.

२०१५ नंतर आरसीबीमध्ये प्रवेश केलेल्या कार्तिकला संघात सामील केल्याने हेसन आनंदी आहे. आम्ही मधल्या फळीत खूश आहोत आणि आम्हाला डीके देखील आवडला आहे, ज्यामुळे आम्हाला मधल्या फळीत नियंत्रित करणे महत्वाचे आहे. आमच्याकडे अधिक प्रतिभावान खेळाडू आहेत. आरसीबीने दुसऱ्या दिवशी जोश हेझलवूडचा पर्याय म्हणून ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेन डॉर्फलाही विकत घेतले आहे. अशा स्थितीत संघाची गोलंदाजीही संतुलित दिसत आहे. जेसनसह हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड संघाची वेगवान गोलंदाजी मजबूत करू शकतात.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप