विराटनंतर कसोटी कर्णधार कोण होणार? स्टीव्ह स्मिथनेही सांगितली दोन नावे..!

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ देखील विराट कोहलीने कसोटीत कर्णधार बनून केलेल्या कामगिरीने प्रभावित झाला आहे. काही आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने टीम इंडियाचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण चकित झाले होते. कोहलीने सात वर्षे टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ४२ महिने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता.

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आता कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथही या प्रश्नात सामील झाला असून आता त्याने भारतीय संघात कसोटी कर्णधार होऊ शकतील अशी दोन नावेही दिली आहेत.

एका इंस्टाग्राम लाइव्हमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर एका चाहत्याने स्मिथला भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण असावा असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर द्यायला स्मिथने एक सेकंदही उशीर केला नाही.

हे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना स्मिथ म्हणाला, सर्वप्रथम विराटचे अभिनंदन ज्याने गेल्या सहा-सात वर्षांपासून भारतीय संघाचे उत्कृष्ट नेतृत्व केले आहे. त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि पुढे पाहताना मी म्हणेन की कदाचित रोहित (शर्मा) किंवा केएल (राहुल) ही दोन नावे आहेत जी कर्णधार बनण्यासाठी योग्य आहेत. जोहान्सबर्गमधील एकमेव कसोटीत केएल राहुलने कर्णधारपद भूषवले होते. त्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर तीन एकदिवसीय मालिकेतही कर्णधारपद भूषवले होते. तिथेही टीम इंडियाला विजय मिळाला न्हवता. दक्षिण आफ्रिकेने मालिका ३-० ने जिंकली होती.

T-२० विश्वचषक विजेत्या स्मिथला यावेळी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केले नाही. तो या लिलावात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला की आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी शिखर धवनसोबत खेळताना खूप मजा आली होती. तो म्हणाला की धवन एक अद्भुत खेळाडू आणि एक अद्भुत माणूस आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज होण्याची स्पर्धा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, मात्र गेल्या काही काळापासून हे दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये दिसत नाहीत ज्यासाठी ते ओळखले जातात. दोघांनी आपापल्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप